29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयशंभर बापांचा नसशील, तर माझ्यावरचा एक तरी आरोप सिद्ध करून दाखव ;...

शंभर बापांचा नसशील, तर माझ्यावरचा एक तरी आरोप सिद्ध करून दाखव ; भास्कर जाधवांचे मोहित कंबोजना आव्हान

उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षात सामील करून घेण्यासाठी मिनतवाऱ्या करत होतो या कंबोज यांच्या आरोपाचा जाधव यांनी तिखट शब्दांत समाचार घेतला आहे. “तू जर शंबर बापाची ‘औलाद’ नसशील तर माझ्यावर लावण्यात आलेल्या चारपैकी एक तरी आरोप सिद्ध करून दाखव”, असे जाहीर आव्हान त्यांनी कंबोज यांना दिले आहे. सभागृहात मुद्दे मांडल्याचा राग मनात बाळगून देवेंद्र फडणवीस यांनी मोहित कंबोजच्या माध्यमातून हे सर्व षडयंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर सत्ताधारी भाजप कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (prove at least one accusation against me bahskar jadhav challange to mohit kamboj)

भास्कर जाधव यांनी भाजपच्या मोहित कंबोजवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, मोहित कंबोजवर महाराष्ट्रातीलच एका अनाजी पंताचा वरदहस्त आहे. तोच त्याला या सर्व गोष्टी करण्यासाठी कामाला लावत आहे. कोण आहे हा मोहित कंबोज? २०१३ मध्ये हा भाजपमध्ये सामील झाला. त्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध आहेत. त्याने माझ्यावर चार आरोप लावले आहेत. २२ जूनला मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शंभरवेळा फोन केले. त्याने माझ्यावर दुसरा आरोप असा लावला आहे की, मी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षात घेण्यासंदर्भात निवेदन दिले होते. माझ्यावर त्याने तिसरा आरोप लावला आहे की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे ४० आमदार गेले होते त्यांना सतत विनवणी करून त्यांच्या पक्षात घेण्यासाठी शिफारस केली. माझ्यावरचा चौथा आरोप कंबोज याने केला आहे की, भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचे तिकीट काढले होते, आणि जोपर्यंत तुम्ही मला तुमच्या पक्षात घेत नाहीत तोपर्यंत मी माझ्या जागेवरून हलणार नाही, असे मी म्हणालो होतो असे कंबोज म्हणत आहे. मी मोहित कंबोजला जाहीर आव्हान देतो की, तू जर शंभर बापांची ‘औलाद’ नसशील, तर या चार आरोपांपैकी एक तरी आरोप सिद्ध करून दाखव, अशा आक्रमक भाषेत भास्कर जाधव यांनी कंबोज यांना खडसावले आहे.

भास्कर जाधव यांनी उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मी सभागृहात काही मुद्दे मांडले. त्यामुळे त्यांनी सूडभावनेने हे सर्व षडयंत्र रचले आहे”, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. या त्यांच्या आरोपावरून महाराष्ट्रातील अनाजी पंत म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचे सूचित होत आहे. शंभर वेळा तर सोडाच, पण एकनाथ शिंदे यांना पाच वेळा जरी फोन केल्याचे सिद्ध झाले, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि गावी शेती करेन, असे आव्हानच त्यांनी भाजपला दिले आहे. मला सभागृहात बोलू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “मला जर का सभागृहात बोलू दिले नाही, तर मी सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बोलेन. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृह हे व्यासपीठ आहे. पण आपल्याला जर का त्या ठिकाणी बोलू दिले जात नसेल तर नाईलाजास्तव मला सभागृहाबाहेर बोलावे लागेल”, अशा रोखठोक भाषेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावले आहे.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंची अवस्था ‘शोले’तील असरानीसारखी

दारूवाल्यांवर माविआ सरकारची खैरात, फाईल ओपन होणार ; आशिष शेलार यांचा इशारा

VEDIO : सरकार जोमात, शेतकरी कोमात ; विरोधकांची सरकारविरोधात विधानभवनात घोषणाबाजी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी