34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयशरद पवार आणि राहुल गांधी यांच्या 'या' फोटोची सोशल मीडियात चर्चा

शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या ‘या’ फोटोची सोशल मीडियात चर्चा

कर्नाटकात आज सिद्धरमय्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. सिद्धरमय्या यांनी मुख्यमंत्रीपदी तर डी.के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह विविध पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी राहुल गांधी यांनी शरद पवार यांचा हात हातात घेतलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

कर्नाटक विधानसाभा निवडणुकीत भाजपला चितपट करत काँग्रेसने बहुमताचे सरकार स्थापन केले आहे. कर्नाटकातील जनतेने काँग्रेसला अच्छे दिन दाखवले असून काँग्रेसला जणू नवसंजीवनीच मिळाली आहे. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसने आपली शक्ती कर्नाटकात दाखवली आहे. ही निवडणुक आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. शरद पवार यांनी देखील कर्नाटक निवडणुक निकाला नंतर लगेचच महाराष्ट्रात महाविकास आघाडीची बैठक घेत आगामी रणनीतीवर चर्चा केली. कर्नाटकनंतर केंद्रातून तसेच राज्यातून भाजपचे सरकार घालविण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.

राहुल गांधी आणि शरद पवार यांचा सिद्धरमय्या यांच्या शपथविधी सोहळ्यातील फोटो देखील बरेच काही सांगून जातो. आगामी काळात ही पकड आणखी घट्ट होण्याचा संदेशच जणू या फोटोतून दिसून येत असल्याचे जाणवते. भाजपविरोधात अद्यापतरी देशपातळीवर आघाडी झालेली नाही. त्यात तिसरी आघाडी होणार की, काँग्रेससोबत इतर पक्ष भाजप विरोधात लढणार याचे चित्र देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. नितीश कुमार यांनी देशातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांनी गांधी परिवाराची देखील भेट घेतली होती. तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतली होती.


शरद पवार देशपातळीवर आणि राज्यात देखील भाजप विरोधात आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग त्यांनी सन 2019 मध्ये केला होता. आता देखील महाविकास आघाडी एकसंध ठेवण्याबाबत ते प्रयत्नशील आहेत. नुकतीच त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत मुंबईत बैठक घेतली. राज्यातील जागावाटपाचा पेच सोडविण्यासाठी त्यांनी या बैठकीत प्राथमिक चर्चा केली होती.

हे सुद्धा वाचा

समीर वानखेडे यांची सीबीआयकडून तीन तास चौकशी

कर्नाटकात सिद्धरमय्या सरकारचा शपथविधी : राहुल गांधी म्हणाले दोन तासांत आश्वासने पूर्ण करणार

PUBG लव्हर्ससाठी आनंदाची बातमी, भारतात लवकरच पुन्हा गेम सुरु होणार

दरम्यान आज राहुल गांधी यांच्यासोबत शरद पवार यांचा फोटो व्हायरल झाला. अत्यंत आत्मविश्वासाने राहुल गांधी यांनी पवार यांचा हात हातात घेतलेला हा फोटो दोन्ही नेत्यांमधील आश्वासक संबंध दर्शवित असल्याचे दिसून येत आहे. पवार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींमध्ये सक्रीय झाले असून देशपातळीवरी भाजपविरोधी आघाडीत देखील त्यांचे महत्त्व असणार आहे, अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात होत आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी