31 C
Mumbai
Thursday, August 31, 2023
घरराजकीयअदानी यांच्या गुंतवणुकीतला पैसा कुणाचा? राहुल गांधी यांचा मोदींना थेट सवाल

अदानी यांच्या गुंतवणुकीतला पैसा कुणाचा? राहुल गांधी यांचा मोदींना थेट सवाल

उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात विदेशातील वृत्तपत्रात दररोज बातम्या येत आहेत. अडाणी यांच्या प्रकल्पात नक्की गुंतवणूक कोणाची आहे, याचे उत्तर मोदी यांना आज ना द्या द्यावेच लागेल, असा थेट सवाल कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी देशात पारदर्शक कारभार आणण्यासाठी आग्रही आहेत, त्यामुळे त्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी इंडियाच्या बैठकीला आज मुंबईत आले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी यांना अनेक प्रश्न विचारले आहेत.

अदानी देशातील विविध महत्वाच्या प्रकल्पावर काम करत आहेत. असे असताना त्यांचे भागीदार नासर अली, सदाम अली आणि चीन रहिवासी चॅन च्यूग लिन कसे? देशातील महत्वाच्या प्रकल्पावर अदानी समूह काम करत असताना, या कंपन्यांवर परकीय व्यक्ती कशा, या व्यक्ती मोदींना चालतात कशा? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. अदानी यांच्या कंपनीच्या माध्यमातून 1 बिलीयन डॉलर अशी मोठी रक्कम विविध देशात गेली. त्याची चौकशी पंतप्रधान मोदी करणार का, असाही सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

अदानी यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला? ज्याच्या जिवावर ते देशातील विमानतळ घेतात, धारवीचा जंबो प्रकल्प त्यांना देण्यात आला आहे. विविध सरकारी कंपन्या अशा महत्वाच्या असेटस खरेदी करत आहेत, याचे उत्तर देशाला मोदी यांनी दिले पाहिजे. एखाद्या व्यक्तीचा गैरव्यवहार निदर्शनास आल्यावर सीबीआय, इडीमार्फत चौकशी होते. मग अदानी यांची अशा यंत्रणामार्फत चौकशी का करत नाही, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी संयुक्त संसदीय समिती (जीपीसी) मार्फत अडाणी प्रकरणाची चौकशी का करत नाही, असा सवालही गांधी यांनी केला आहे.
हे सुद्धा वाचा 
राहुल गांधींना अदानी पावला…
मंत्रालयाजवळ स्फोट! काही दगड आदळले, खिडक्यांच्या काचा फुटल्या
गिरीष महाजनांचे पाऊल आदित्य ठाकरेंच्याही पुढे
अदानी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाल्यावर सेबीमार्फत त्यांची चौकशी झाली, पण त्यात त्यांना क्लीनचिट देणारा सेबी अध्यक्ष आता एक वृत्तवहिनीचा संचालक झाला आहे, ही बाबही राहुल गांधी यांनी निदर्शनास आणली आहे. मोदी देशात पारदर्शी कारभार आणण्यासाठी आग्रही असताना अदानी समूहावर विविध आरोप होत असताना मोदी त्यांना का वाचवत आहेत. अदानी यांच्या गुंतवणुकीतला पैसा कुणाचा? असा सवालही त्यांनी मोदी यांना केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी