27 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरराजकीय"इंटेलिजंट" मुलगी मिळाली तरच लग्न करेन; राहुल गांधींची अट

“इंटेलिजंट” मुलगी मिळाली तरच लग्न करेन; राहुल गांधींची अट

‘यंदा तरी कर्तव्य आहे का?’ असा प्रश्न सर्वात जास्त कोणाला विचारला गेला असेल तर ते आहेत बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि काँग्रेसचे युवराज राहुल गांधी. सलमान खान कधी लग्न करणार हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे मात्र बोहल्यावर चढायला तयार झाले आहेत, पण त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. मी लग्न करायला तयार आहे. (Rahul Gandhi ready for marriage but Will marry only if he get an “intelligent” girl) पण त्यासाठी बुद्धिमान मुलगी पाहिजे, अशी अटच राहुलबाबांनी घातली आहे. माझ्या आई-वडिलांचे लग्न उत्तमरित्या झाले. माझेही लग्नासंबंधीचे विचार उच्च दर्जाचे आहेत असे सांगत मलाही अशीच जीवनसाथी हवी आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

भगवानही म्हणतात… राम सीतेसोबत बसून दारू प्यायचे!

Rahul Gandhi सत्तेत आल्यास देशातील संस्था आरएसएस मुक्त करू; राहूल गांधी यांचे आश्वासन

अंधश्रद्धा निर्मूलनकारांचा विज्ञानावरही अविश्वास; राम कदम यांची खोचक टीका

 

एका खासगी यूट्यूब चॅनेलला मुलाखत देताना त्यांनी आपल्या विवाहसंबधीचे विचार उघडपणे व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्याचे अनुभवकथन केले. आपल्या आवडीनिवडींविषयीही त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. राहुल गांधी यांनी आपल्या ‘भारत जोडो’ यात्रेतील अनुभवही यावेळी कथन केले आहेत. ते म्हणाले, ‘भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून मला देशाची संस्कृती जवळून पाहता आली. देशाची विविधांगी खानपानाच्या सवयीदेखील अनुभवता आल्या. तेलंगणसारख्या काही राज्यांमध्ये मसालेदार पदार्थांचा उपयोग अधिक केला जातो.” राज्याच्या आतही अनेक प्रकारच्या संस्कृती सामावल्या आहेत असे सांगत संस्कृती केवळ राज्यांच्या सीमेनंतरच नाही, तर ती राज्यांच्या आत देखील बदलत असते, असे गांधी यांनी सांगितले.

भारत जोडो ही एक तपस्या आहे
राहून गांधी म्हणाले,’मला जर राग आता तर मी शांत बसतो. माझ्या पक्षातील लोक माझ्या विवासंबंधी सतत विचारणा करत असतात. पण मी त्यांना ठामपणे नकार दिला आहे. भारत जोडो यात्रा ही एक तपस्या आहे. भारतीय संस्कृतीत तपस्येला मोठे महत्त्व आहे. कोणत्याही कामात येणारे अडथळे ही एक प्रकारे तपस्याच असते. देशात लाखो लोक तपस्या करत आहेत.”

तंदुरी खूप आवडते
या मुलाखतीत राहुल गांधींनी आपल्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडींविषयी सांगितले. ते म्हणाले, ‘मला तंदुरी फार आवडते. चिकन टिक्का, सीख कबाब आणि चांगले ऑमलेट खूपच आवडते. पण मी मिठाईपासून चार हात लांबच राहतो. फणस आणि मटर बिलकुल आवडत नाही.”

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी