राहूल गांधी यांच्या सावरकरांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाला आहे. मात्र आज अकोल्यात झालेल्या राहूल गांधी यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट सावरकर यांनी ब्रिटिशांकडे मागितलेल्या माफीनाम्याची कागदपत्रेच जाहीर केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी हा माफीनामा पहावा असा टोला देखील यावेळी त्यांनी लगावला.
सध्या राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. राहूल गांधी यांनी सावरकरांच्या माफीनाम्यावर भाष्य केले. त्यानंतर भाजप आणि शिंदेगटाने राहूल गांधी यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. तसेच आंदोलने देखील केले. तसेच भारत जोडो यात्रा रोखण्याची मागणी देखील काही नेत्यांनी केली. दरम्यान राहूल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत सावरकरांनी मागितलेल्या माफीनाम्याची कागपत्रेच सादर केली.
तसेच ज्यांना ही भारत जोडो यात्रा रोखावी वाटत असेल त्यांनी ही यात्रा रोखण्याचा प्रयत्त्न करुन दाखवावा, असे आव्हान देखील यावेळी दिले. कोणाला आपले विचार मांडायचे असतील तर त्यांना त्यांचे विचार मांडून दिले जावेत अशी भूमिका देखील त्यांनी यावेळी मांडली. या पत्रकारपरिषदेत राहूल गांधी यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या माफीनाम्याची कागदपत्रे सादर केली. तसेच माफीनाम्यातील काही ओळी देखील त्यांनी यावेळी वाचून दाखविल्या.
हे सुद्धा वाचा :
Underworld Dawn : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची निर्दोष मुक्तता
Rahul Shewale : ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात बंद करावी : राहुल शेवाळे
PHOTO: या सहा सोप्या सवयी ठेवतील तुम्हाला निरोगी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा माफीनामा बघावा असा टोला त्यांनी लगावला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांची मदतच केली असल्याचे यावेळी राहूल गांधी म्हणाले. सावरकरांनी घाबरून माफीनाम्यावर सही केल्याचे सांगत त्यांनी इतर स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांशी दगाबाजी केल्याचे देखील राहूल गांधी यावेळी म्हणाले.