26 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरराजकीयराज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मराठी अस्मितेला हात, ठिगळ लावलेली अस्मिता नकोच...

राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मराठी अस्मितेला हात, ठिगळ लावलेली अस्मिता नकोच…

मुलुंडमधील प्रकरणानंतर तृप्ती देवरुखकर यांच्या निमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी थेट व्यंगचित्र काढून मराठी अस्मिता ठिगळ लावलेली असल्याकडे लक्ष वेधले आहे. तुप्ती देवरुखकर यांना मुलुंडमधील एक सोसायटीच्या परप्रांतीय पदाधिकाऱ्यांनी मराठी म्हणून कार्यालयासाठी जागा नाकारली होती. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सज्जड दम भरल्यानंतर सोसायटीचे पदाधिकारी ताळावर आले आणि त्यांनी माफी मागितली. त्यानंतर राज ठाकरेंनी ट्वीटरच्या माध्यमातून मराठी माणसावर मुजोरी करणाऱ्यांना दम भरला. ‘हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित.’ असा इशारा राज ठाकरेंनी काल दिला होता.

राज ठाकरे यांनी आज कार्टून काढून मराठी समाज कुठे गुरफटून गेलाय, याकडे लक्ष वेधले आहे. राजधानी हातातून गेली की राज्य गेलं… आज महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसांना जेरीस आणून हातातून हिसकावून घेतली जात आहे. पण तरीही आम्ही एकसंध मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही. आम्ही जातीय विद्वेषात गुरफटलो आहोत. #मराठीमाणूस

या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी तमिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात, पंजाब आणि मराठी अस्मिता काय आहे हे दाखवले आहे. यातील पहिल्या चार राज्यांची अस्मिता म्हणजे ते प्रत्येक राज्यात भाषिक ऐक्य, सामाजिक ऐक्य आहे. तर महाराष्ट्राची अस्मिता ब्राह्मण, आगरी, मराठा, दलित, मातंग, माळी, वंजारी आणि इतर जाती-पोटजातीत कशी अडकून पडलीय, हे दाखवून दिले आहे.

इतर राज्यांमध्ये जशी एकी आहे, इतर राज्यांची जशी भाषिक अस्मिता आहे, तशी मराठी माणसामध्ये नाही. इतर राज्यांतील लोक भाषेच्या झेंड्याखाली एकत्र येतात, भले त्यांचा धर्म-पंथ कोणताही असो. आपण गुजराती म्हणून, बंगाली म्हणून, पंजाबी म्हणून, तमिळ म्हणून ही मंडळी जशी एकत्र येतात तसा मराठी माणूस एकत्र येत नाही. उलट एकत्र येण्याऐवजी महाराष्ट्रात मराठी माणूस जात-पोटजातीच्या नावाखाली विभागला जात आहे. त्यामुळे मराठी अस्मितेला जाती-पोटजातींचे ठिगळ लागले आहे, अशा आशयाचे राज ठाकरे यांचे व्यंगचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होते आहे.

हे ही वाचा

…तर गालावर वळ उठतील, राज ठाकरेंचा इशारा, जव्हारमध्येही परप्रांतीयाची मुजोरी

मराठा आरक्षणाच्या वाटेत अडचणींचे काटे, १ कोटी दस्तऐवजांत केवळ पाच हजार कुणबी नोंदी

21 दिवसांनंतर ओबीसींचं उपोषण मागे, फडणवीसांची शिष्टाई यशस्वी

राज ठाकरे यांनी यापूर्वी अशाच प्रकारचे व्यंगचित्र काढून मराठी अस्मितेला हाक घातली होती. आताही त्यांनी तसाच प्रयत्न केला आहे. आता यातून मराठी माणूस जागा होणार की पुन्हा एकमेकांवर आरोप करून ठिगळालाच मेडल समजणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी