24 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरराजकीयVIDEO : राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे मराठी माणसांची डोकी फुटतात

VIDEO : राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे मराठी माणसांची डोकी फुटतात

राज ठाकरेंनी केली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आजाराची मिमिक्री .

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या आक्रमक भूमिकेसाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरलेले असतात, त्यात त्यांनी केलेली नेत्यांची मिमिक्री हे त्यांच्या भाषणाचा मुख्य आकर्षण ठरतं, यावेळी सुद्धा असेच काही झाले. राज ठाकरेंनी चक्क माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच मिमिक्री केली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरें यांनी रविवार (27 नोव्हेंबर) रोजी गोरेगावमधील नेस्को सभागृहात मनसेच्या सर्व गटप्रमुखांशी संवाद साधाला होता. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून “त्यांनी केवळ पैसा आणि स्वार्थासाठी राजकारण केलं, त्यांनी कधीच कोणती भूमिक घेतली नाही.” अशी टीका ही उद्धव ठाकरेंवर केली. तसेच मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी तब्येतीचा बहाना सांगत कोणतेही काम केले नाही असा आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर लावला. यादरम्यान राज ठाकरेंनी उद्धव ठाकरें यांची नक्कल ही काढून दाखवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले “एकनाथ शिंदेनी मात्र एका रात्री कांडी फिरवली आणि बाकी सर्व बघतच राहीले”, अस म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला देखील लावला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!