29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
घरराजकीयमनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंची विरोधकांवर जोरदार टोलेबाजी; भाजपलाही दिला इशारा

मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंची विरोधकांवर जोरदार टोलेबाजी; भाजपलाही दिला इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काल (ता. 9 मार्च) 17वा वर्धापन दिन होता. दरम्यान पक्षप्रमुख राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आरोप-प्रत्यारोपातून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. त्याचप्रमाणे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडल्याचं देखील पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची वर्धापनदिनाची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.

“सध्याचे राजकारण महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारे असल्याचे सांगत येत्या २२ तारखेला मशीदीवरील भोंग्याचा समाचार घेणार आहे. तसेच, देशावर ६० वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसची काय अवस्था झाली आहे, ते बघा. त्यामुळे भरती नंतर ओहोटी आणि ओहोटी नंतर भरती या गोष्टी होत राहतात. भाजपानेही हे लक्षात ठेवावं आज भरती चालू आहे. ओहोटी येऊ शकते, कारण त्या नैसर्गिक गोष्टी आहेत. कोणी थांबवू शकत नाही,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. मनसेच्या 17व्या वर्धापनदिनानिमित्त ठाण्यात गडकरी रंगायतन येथे राज ठाकरेंनी मनसैनिकांना संबोधित केलं. तेव्हा ते बोलत होते.

“प्रत्येक राजकीय पक्षांना त्रास होतोच. भाजपा आज सत्तेवर आल्याचे दिसते. पण, त्यासाठी किती तरी जणांनी खस्ता खाल्या आहेत. १९५२ मध्ये जनसंघ स्थापन झाला. १९५२ ते २०१४ इतक्या कालावधीनंतर त्यांचे बहुमतात सरकार आलं. या प्रक्रियेतून सगळ्यांनाच जावे लावते. पण, तुम्ही त्यांच्या कालावधीचे आकडे मोजू नका, मी लवकरच आपले सरकार आणेल. आपण सत्तेपासून दूर नाही, हे मळभ दूर होईल,” असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलं आहे.

“पालिका निवडणुका जिंकायच्या आहेत. मात्र, निवडणुका कधी होतील माहित नाही. निवडणुका होत नसल्यामुळे दहावीला नापास झाल्यासारखे वाटते आहे. जेव्हा कधी पालिकांच्या निवडणुका होतील, तेव्हा आपण सत्तेत असणार म्हणजे असणारच. कारण दररोज जे तमाशे सुरु आहेत, त्याला जनता विटली आहे,” असेही राज ठाकरेंनी म्हटलं.

हे सुद्धा वाचा : 

राजभैय्या..! तुमच्या मित्राचं सरकार आलं आहे, अजान बंद कधी करणार? तोगडियांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

मनसे कार्यकर्त्यांमुळे उत्तर भारतीयांना त्रास, पण आता ते दिवस संपले…

मोठी बातमी : मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी