29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीय'राजा वही बनेगा जो हकदार होगा', संदीप देशपांडे यांच्याकडून सूचक ट्वीट

‘राजा वही बनेगा जो हकदार होगा’, संदीप देशपांडे यांच्याकडून सूचक ट्वीट

टीम लय भारी

मुंबई : सत्तांतराच्या नाट्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे. शिवसेना नेमकी कोणाची अशी आग भडकली असताना आता मनसे सुद्धा या वादात उडी घेणार का अशा उलट – सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज एक सूचक ट्विट करून ‘राजा वही बनेगा जो हकदार होगा’ असे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेवर हक्क सांगण्यासाठी मनसे सुद्धा पुढे सरसावणार का हे पाहणे आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संदीप देशपांडे हे नेहमीच माध्यमांवर सक्रीय असतात आणि दरवेळी मनसेच्या भूमिकेविषयी असे काहीतरी बोलून जातात की त्यावर आपोआपच माध्यमांमध्ये चर्चा सुरू होते. आतासुद्धा देशपांडे यांनी केलेले ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे. संदीप देशपांडे ट्वीटमध्ये लिहितात, “अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा” असे म्हणून त्यांनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे एकत्रपणे जनतेला नमस्कार करीत असल्याचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.

त्यावर लोकांनी सुद्धा उत्सुकता म्हणत भराभर राज ठाकरे यांचे फोटो पोस्ट करून उत्सुकता असे म्हटले आहे, तर कोणी टीकेचे बाण सोडले आहेत. दरम्यान देशपांडे यांनी पोस्ट केलेला फोटो फारच बोलका आणि सद्यस्थितीतील मनसेची भूमिका स्पष्ट करणार आहे. या ट्विटनंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जो पुढे घेऊन जाईल, त्यालाच जनता आता मान्य करेल. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेत आहेत. राज्यातील जनतेची ही भावना आहे.

पुढे देशपांडे म्हणाले, बाळासाहेब आणि त्यांचे विचार हे कोणाचीही प्रॉपर्टी नाही. व्यक्तीवर मालकी हक्क असू शकत नाही.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर फक्त प्रकाश आंबेडकर यांचाच हक्क आहे का? बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जो पुढे घेऊन जाईल, त्यालाच जनता आता मान्य करेल. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेत आहेत असे म्हणून त्यांनी राज ठाकरे यांची यावेळी पाठराखण केली, त्यामुळे या अभूतपुर्व उद्धवलेल्या राजकीय संकटाला कोण तारून नेणार हे पाहणे आता नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

नवनिर्वाचित राष्ट्रपती उमेदवार द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ

ISC बारावी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर, उपासना नंदी देशात पहिली

‘तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही हे परत एकदा सिद्ध’, मिटकरींचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी