32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयराजभैय्या..! तुमच्या मित्राचं सरकार आलं आहे, अजान बंद कधी करणार? तोगडियांचा राज...

राजभैय्या..! तुमच्या मित्राचं सरकार आलं आहे, अजान बंद कधी करणार? तोगडियांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

‘ज्या ठिकाणी मोठ्या आवाजात भोंगे वाजत आहेत त्याबाबत पोलिसांमध्ये तक्रार करा, पोलिसही कारवाई करण्यास टाळाटाळ करत असतील, तर ट्रकवर स्पीकर लावून मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावा’, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मध्यंतरी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ यांसारख्या अन्य राजकीय आंदोलनांप्रमाणेच हे आंदोलनही ‘खोक्यात’ गुंडाळून ठेवले की काय? अशी शंका हल्ली सर्वसामान्य जनतेला येऊ लागली आहे. (Rajbhaiya..! Your friend’s government has come, when will Azan stop?) मनसेच्या या धरसोड वृत्तीवर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनीदेखील प्रश्न उपस्थित केला आहे..

Rajbhaiya..! Your friend's government has come, when will Azan stop?

मशिदींवरील भोंग्यांविरोधात (MNS protest against Loudspeakers) मनसेने सुरु केलेल्या आंदोलनाबाबत राजकीय वर्तुळातूनही उपरोधिक सूर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना अजाणविषयी किंवा मशिदींवरील भोंग्यांबाबत आता तुमची भूमिका काय आहे? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी प्रश्नाचे उत्तर राज ठाकरेंकडे मिळेल, असे सूचित केले. ते म्हणाले, “तुम्ही राज ठाकरेंना हा प्रश्न विचारा. त्यांच्या मित्रांचं सरकार आलं आहे. आता तुम्ही कधी आंदोलन करून अजान बंद करणार आहात?, ” असे खोचक प्रश्न तोगडिया यांनी राज ठाकरेंना विचारले आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमचे राजभैय्या मैदानात उतरले होते. आता त्यांच्या मित्रांचं सरकार आलं आहे. देवेंद्रभाऊ आणि एकनाथ शिंदे यांच्या राज्यातही राज ठाकरे यांनी मैदानात उतरावं. आम्ही त्यांना साथ देऊ”, असं प्रवीण तोगडिया म्हणाले.

मनसेचे ‘लाऊडस्पीकर’ आंदोलन
मागील मे महिन्यामध्ये मनसेने भोंग्यांवरील मोठ्या आवाजातील अजानविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला अल्टिमेटमही दिला होता. याविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा देखील लावण्यात आली. मशिदीवरील भोंगे उतरत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा राज ठाकरे यांनी माविआ सरकारला दिला होता. या आंदोलनामुळे काही काळासाठी काही मशिदींवरील भोंगे उतरवण्यातही आले होते. पण नंतर मनसेच्या अन्य आंदोलनांसारखेच हे आंदोलनही थंड पडले.

हे सुद्धा वाचा

VIDEO : राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे मराठी माणसांची डोकी फुटतात

एकाच वेळी 400 पदाधिकाऱ्यांनी ‘राज ठाकरें’ना केला अखेरचा जय महाराष्ट्र !

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडावर आवर घालावा : राज ठाकरे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी