29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
HomeराजकीयRaksha Bandhan 2022 : धनंजय मुंडेंना नऊ बहिणी, पण सर्वात पहिल्यांदा पंकजाताई...

Raksha Bandhan 2022 : धनंजय मुंडेंना नऊ बहिणी, पण सर्वात पहिल्यांदा पंकजाताई राखी बांधायच्या!

सख्या आणि चुलत बहिणी मिळून धनंजय मुंडे यांना नऊ बहिणी आहे. त्यातील राजकीय कारणांंमुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे आणि इतर काही बहिणी दुरावल्या आहेत, त्यामुळे आता ते सख्या बहिणींकडून राखी बांधून घेतात, हजारो कार्यकर्त्यांकडून राखी बांधून घेतात. एक काळ असा सुद्धा होता जेव्हा या नऊ बहिणींमध्ये नेहमी पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना पहिली राखी बांधायच्या, पहिली भाऊबीज करायच्या, त्यावेळी सख्या बहिणींपेक्षा सुद्धा बहिण म्हणून पंकजा मुंडे यांनी मोठे महत्त्व होते. 

रक्षाबंधन हा सुद्धा आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा मानला जाणारा असा सण. बहिण – भावाच्या नात्याचे सुंदर विश्लेषण म्हणजे रक्षाबंधन. वेगवेगळ्या राख्यांनी नटलेली दुकाने या दिवशी या सणाला आणखी खुलवतात आणि बहिण भावाच्या नात्यातील घट्ट वीणीला आणखी गुंफून टाकतात. राज्यभर मोठ्या उत्साहात हा सण सर्वसामान्यांपासून अगदी मोठ्या दिग्गजांपर्यंत सगळेच साजरा करतात. या दिवशी महाराष्ट्रात सगळीकडे एका बहीणभावाच्या नात्याची मात्र आवर्जून आठवण काढली जाते आणि माध्यमे सुद्धा दिवसभर या बहिणभावाच्या कव्हरेजला जास्त महत्त्व देते. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे असे या जोडगोळीचे नाव दरवर्षी रक्षाबंधनाच्या वेळी आवर्जून महाराष्ट्रात चर्चिले जाते.

राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातील बहिण – भावाच्या नात्याची एकेकाळी खूपच प्रशंसा होत असे परंतु 2012 साली धनंजय मुंडे यांनी भाजप सोडले आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तेव्हापासून त्यांच्यात आणि पंकजा मुंडे यांच्यात कटुता निर्माण झाली. धनंजय मुंडे यांनी भाजप सोडणे हा पंकजा मुंडेंसह अवघ्या मुंडे कुटुंबासाठी धक्का मानला जात होता. धनंजय मुंडे यांनी राजकारणासाठी वेगळा मार्ग निवडला तसा बहिण भावाच्या नात्यातही दुरावा निर्माण झाला, त्यांचे पंकजा मुंडेंसोबतचे संबंधच बदलले.

Raksha Bandhan 2022 : धनंजय मुंडेंना नऊ बहिणी, पण सर्वात पहिल्यांदा पंकजाताई राखी बांधायच्या!

धनंजय मुंडे यांना सख्या तीन बहिणी आहेत. गंगाखेड येथे राहणाऱ्या उर्मिला मधुसुदन केंद्रे, लातूर येथे राहणाऱ्या शकुंतला त्रिंब्यकराव केंद्रे आणि पुण्यात राहणाऱ्या प्रमिला पुरुषोत्तम केंद्रे अशा तीन सख्या बहिणी आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधण्यासाठी दरवर्षी रक्षाबंधनाची वाट पाहत असल्या तरीही धनंजय मुंडे राजकारणात कमालीचे व्यस्त असल्याने दरवेळी त्यांना राखी बांधणे शक्य होत नाही. जेव्हा जेव्हा ते जिथे तिथे कुठे असतील त्या त्या बहिणीकडून मुंडे राखी बांधून घेत असतात, परंतु कधीतरी असे होते की वेळ काढून सगळे एकत्र येतात आणि एकत्रितपणे हा रक्षाबंधनाचा सण साजरा करतात.

ऐकून आश्चर्य वाटेल पण अगदी साध्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्याकडे रक्षाबंधनाचा हा सण साजरा होतो. कधी मुंडे परळी येथे असल्यास हजारो कार्यकर्त्या महिला गावांतून – शहरांतून येत धनंजय मुंडेंना राखी बांधतात. दरवेळी रक्षाबंधनाच्या वेळी राखी बांधून घेणे धनंजय मुंडे यांना शक्य होत नाही त्यामुळे त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हा राखीचा सण मोठ्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो. या प्रसंगी राजकीय वादामुळे दुरावलेल्या पंकजा मुंडे यांची आठवण मात्र जरूर काढली जाते.

हे सुद्धा वाचा

Mahadev Jankar : मेंढपाळपुत्र ते कॅबिनेटमंत्री; महादेव जानकरांचा थक्क करणारा प्रवास

Raksha Bandhan 2022 : महिलांसाठी बस प्रवास मोफत!

Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे – पाटलांच्या संभाव्य महसुल खात्यात गाववाले सचिव !

एकदा मुलाखतीच्या वेळी रक्षाबंधनाच्या आठवणींना उजाळा देताना धनंजय मुंडे म्हणाले, आम्ही वेगळे होण्याअगोदर माझ्या आयुष्यात रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली राखी मला पंकजाताईनी बांधली आहे आणि भाऊबीजेची पहिली ओवाळणी सुद्धा पंकजाताईनीच केली आहे. मी माझ्या सख्ख्या बहीणींकडून कधी राखी बांधून घेतल्याचे त्यावेळी मला आठवत नाही. परंतु पंकजाताईंकडून प्रत्येक वर्षी राखी बांधत होतो. माझ्या घरातून तसं सांगितलं जात होतं की आधी पंकजा, प्रीतम आणि नंतर माझ्या सख्ख्या बहीणी…आमच्या नात्यात राजकारणामुळे दुरावा निर्माण झाला असली तरी नात्यात संवाद असावा अशीच माझी कायम भूमिका राहिली आहे.

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढवू देत. परंतु घरातील सुख, दुःखात आपण एकत्र असायला हवं. मी एकत्र येण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण मला त्यात यश आलं नाही. घर म्हणून जो संवाद असायला हवा तो आता आमच्यात नाही” असे म्हणून पूर्वीसारखे भावंडांचे नाते राहिले नाहीत, वाद वाढलेत म्हणून त्यांनी दुःख व्यक्त केले. गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार म्हणून पंकजा मुंडे यांना पुढे आणल्याने धनंजय मुंडे यांची नाराजी झाली होती, त्यातूनच त्यांनी पंकजा मुंडे यांचा हात सोडला.

खरंतर सख्या आणि चुलत बहिणी मिळून धनंजय मुंडे यांना नऊ बहिणी आहे. त्यातील राजकीय कारणांंमुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे आणि इतर काही बहिणी दुरावल्या आहेत, त्यामुळे आता ते सख्या बहिणींकडून राखी बांधून घेतात, हजारो कार्यकर्त्यांकडून राखी बांधून घेतात. एक काळ असा सुद्धा होता जेव्हा या नऊ बहिणींमध्ये नेहमी पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना पहिली राखी बांधायच्या, पहिली भाऊबीज करायच्या, त्यावेळी सख्या बहिणींपेक्षा सुद्धा बहिण म्हणून पंकजा मुंडे यांनी मोठे महत्त्व होते.

यंदाच्या वर्षीच्या रक्षाबंधन कार्यक्रमाची अनिश्चिती सांगण्यात येत आहे. कारण रक्षाबंधन सण उद्यावर आला असला तरीही धनंजय मुंडे मात्र मुंबई मध्येच आहेत. राज्यातील राजकारणात व्यस्थ असणारे हे नेते या वर्षी सुद्धा बहिणींकडून राखी बांधून घेणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी