30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeराजकीयRaksha Bandhan 2022 : महिलांसाठी बस प्रवास मोफत!

Raksha Bandhan 2022 : महिलांसाठी बस प्रवास मोफत!

महिलांना रक्षाबंधनाचे गिफ्ट म्हणून उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांच्या सरकारने या दिवशी बससेवा पुर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील सगळ्याच सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे.

रक्षाबंधन सणाचे निमित्त साधून महिलांसाठी बस सेवा मोफत करण्यात येणार आहे. याबाबत उत्तर प्रदेश, उत्तरराखंड आणि हरियाणा या तीन राज्यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला असून याबाबत संबंधित राज्यांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. महिलांना रक्षाबंधनाचे गिफ्ट म्हणून या तीन्ही राज्यांच्या सरकारने या दिवशी बससेवा पुर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील सगळ्याच सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने ही सुविधा 48 तासांसाठी चालू ठेवण्याचे ठरविले आहे, त्यामुळे महिला वर्गामध्ये आता आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

रक्षाबंधन सणानिमित्त त्या दिवशी महिलांना मोफत बससेवेचा आनंद लुटता येणार आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यांच्या सरकारने राज्यातील महिलांना अनोखे रक्षाबंधन गिफ्ट देण्याचे ठरविले आहे. हरियाणा सरकारने 10 ऑगस्ट म्हणजेच आज दुपारी 12 पासूनच महिलांसाठी मोफत प्रवासाचा उपक्रम सुरू केला आहे. रक्षाबंधन सणानिमित्त हरियाणा सरकारकडून 40 अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत. यासाठी सरकारकडून भरारी पथक नेमण्यात आले असून सगळेच बस ड्रायव्हर बस थांब्यावर थांबून प्रवाशांना आत घेतील याकडे हे पथक लक्ष ठेवणार आहेत.

हे सुद्धा वाचा

Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे – पाटलांच्या संभाव्य महसुल खात्यात गाववाले सचिव !

Shoaib Akhtar : मला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे, शोएब अख्तरचा व्हिडिओ व्हायरल

Shilpa Bodkhe : आधारकार्ड नसल्याने रुग्णालयाने महिलेला प्रसुतीसाठी नाकारले

उत्तराखंड परिवहन निगमकडून सुद्धा महिलांसाठी रक्षाबंधनानिमित्त मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रक्षाबंधनची भेट म्हणून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह भामी यांनी ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर सुविधा केवळ २४ तासांसाठीच असणार आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारकडूनही असाच निर्णय घेण्यात आला असून त्यांनी ४८ तासांसाठी ही सुविधा सुरू ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी