29 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeराजकीयआमदार रोहीत पवारांचे अपयश उघड्यावर पाडण्यासाठी राम शिंदे यांचे आंदोलन

आमदार रोहीत पवारांचे अपयश उघड्यावर पाडण्यासाठी राम शिंदे यांचे आंदोलन

टीम लय भारी

कर्जत: भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याच्या वतीने माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर 9 मार्च 2022 ला भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात किंवा शेतकऱ्यांना योग्य ती सेवा उपलब्ध व्हावी यासाठी राम शिंदे पुढाकार घेणार आहे.(Ram Shinde’s agitation to expose the failure of Rohit Pawar)

शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने सलग 10 तास वीज मिळावी , नादुरुस्त रोहित्रे ( DP ) 24 तासात बदलून मिळावीत व पठाणी पद्धतीने चालू असलेली वीज वसुली त्वरित थांबवावी, अशाप्रकारचे मुद्दे या आंदोलनात मांडणार आहेत. कुकडीच्या अवर्तनाचा गेली अडीच वर्षात झालेला खेळखंडोबा व अनियमित आवर्तन सुधारावे व  जळायला लागलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांसाठी लगेच एक आवर्तन तातडीने मिळावे, याचा देखील विषय मांडणार आहे.

उस उत्पादक शेतकऱ्यांना उसतोडीला उशीर होऊन होऊ घातलेल्या नुकसानी होत असल्याने तातडीने ऊसतोड टोळ्या मिळाव्यात व कारखान्यांनी ऊस उचलावा या प्रमुख मागण्यांसाठी दिनांक 9 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता श्री.महासाती अक्कबाई मंदिर ते तहसील चौक पर्यंत भव्य मोर्चा व रस्तारोको आंदोलन करण्यात येणार असून कर्जत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सामील व्हावे ही नम्र व विनंती आहे. सचिन पोटरे- जिल्हा सरचिटणीस भाजपा अहमदनगर यांनी ही माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

नारायण राणेंचा शिवसेना पक्षावर हल्लाबोल

ईडी विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा हेमंत पाटील यांची मागणी

BJP : भाजपाचा राज्य सरकारवर ‘निशाणा’, ‘गोरगरीब जनता इथे उपाशी, बिल्डरांना मात्र मणीहार…’

Exit polls predict Yogi-led BJP return in UP, give Punjab to AAP

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी