27 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरराजकीयजोगेंद्र कवाडेंना रामदास आठवलेंचा विरोध !

जोगेंद्र कवाडेंना रामदास आठवलेंचा विरोध !

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत युती केली. मात्र या युतीनंतर सध्या भाजपसोबत असलेले आरपीआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) मात्र कमालीचे नाराज झाले आहेत. या मुद्द्यावरुन ते आता भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचे मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत आरपीआयचे नेते अविनाश महातेकर यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. (Ramdas Athawale opposition to Jogendra Kawade!)

राज्यात शिंदे व फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी आम्हाला विचारात न घेता थेट पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत युती केली. याबद्दल आम्ही नाराज आहोत. एकनाथ शिंदे सोबत आमची देखील मैत्री आहे, परंतु त्यांनीही आमचा विचार केला नाही आणि जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत युती केली. त्याबद्दल आमची नाराजी असून या दोन्ही नेत्यांविरोधात आम्ही भाजपातील वरिष्ठ नेत्यांची लवकरच भेट घेणार असल्याचे अविनाश महातेकर यांनी सांगितले
मंत्री आठवले व त्यांचा पक्ष हे 2012 पासून भाजप सोबत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देखील ते जवळचे असल्याची टीका अनेकदा झाली. तरीदेखील आठवले यांनी न डगमगता कायम भाजपलाच पाठिंबा दिला. ज्या ज्या वेळी इतर लोकांनी भाजपवर टीका केली त्यावेळी ते भाजप सोबत ठामपणे उभे राहिले. परंतु आता राज्यात शिंदे व फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी आम्हाला विचारात न घेता थेट पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत युती केली केल्याने आठवले नाराज झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

डॉ. जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना केला सॅल्यूट !

महापालिकांमध्ये स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढणार

अजित पवार किस झाड की पत्ती; पवार घराणं राजकारणातून उखडून टाकणार!

आम्ही केंद्रामध्ये आहोत सध्या राज्यामध्ये भाजप सरकारसोबत आहोत. त्यामुळे आमची स्पष्ट भूमिका आहे की, येत्या महापालिका निवडणुकीमध्ये व नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे, अशी आमच्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची स्पष्ट भूमिका असून ती आम्ही आमचे नेते आठवले यांच्याकडे स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका महापालिका निवडणुकीमध्ये आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व न मिळाल्यास आमच्या पक्षाची भूमिका निवडणुकीदरम्यान वरिष्ठ नेत्यांच्या आदेशान्वये ठरविली जाईल, असे अविनाश महातेकर यांनी संगितले.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी