27 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरराजकीयशिवसेना खासदार-भाजप आमदार यांच्यात खडाजंगी !

शिवसेना खासदार-भाजप आमदार यांच्यात खडाजंगी !

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जगजीतसिंग राणा पाटील यांना 'तु जास्त बोलू नको, तु तुझ्या औकातीत रहा' असे सुनावले. त्यावर 'तुझे संस्कार, तुझी औकात मला ठावूक आहे' असे जगजीतसिंग राणा पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना सुनावले.

भाजप आमदार जगजीतसिंग राणा पाटील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात शनिवारी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार शाब्दिक चकमक झाली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालले नुकसान तसेच पिकविम्याच्या मोबदल्यावरून ठाकरे गट गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक झाला आहे. शनिवारी (दि.3) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पिकविम्याच्या मोबदल्यावरुन ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजीतसिंग यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जगजीतसिंग राणा पाटील यांना ‘तु जास्त बोलू नको, तु तुझ्या औकातीत रहा’ असे सुनावले. त्यावर ‘तुझे संस्कार, तुझी औकात मला ठावूक आहे’ असे जगजीतसिंग राणा पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना सुनावले.

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार जगजीतसिंग राणा पाटील यांच्यातील वैर काही नवे नाही. गेले अनेक वर्षांपासून दोन्ही कुटुंबांमध्ये वैर आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासोमर पीक विम्यासंदर्भात शनिवारी दोघांमध्ये वादावादी झाली. या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियामध्ये मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

हे सुध्दा वाचा
VIDEO : २६ / ११ : मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या तोंडून ऐका चित्तथरारक कहाणी !
उदयनराजे भोसले इतके हतबल झालेले मी गेल्या ५० वर्षात पहिल्यांदा पाहतोय : अनिल गोटे
‘संजय राऊत यांचे तोंड म्हणजे कपडे सुकविण्याचे बॉयलर’

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विम्याच्या संदर्भात बैठक बोलविण्यात आली होती. यासाठी भाजपचे आमदार जगजितसिंग राणा पाटील यांनी काही शेतकऱ्यांना बैठकीसाठी निरोप पाठविला होता. त्यानुसार काही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. ही बैठक सकाळी 11 वाजता होणार होती. मात्र दुपारी 1 वाजला तरी बैठक सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करु लागले. त्याच दरम्यान राणा जगजितसिंग पाटील आणि ओमराजे निबांळकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंग यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. त्यांच्या वादावादीचा व्हिडीओ सोशल मिडीयामध्ये मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे दोघांमध्ये झालेल्या वादाबद्दलच्या चर्चांना देखील सोशल मीडियामध्ये उधाण आलेले पहायला मिळाले.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!