31 C
Mumbai
Wednesday, November 15, 2023
घरराजकीयरोहित पवारांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

रोहित पवारांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनी बंद करण्यासाठी सांगितली होती. यावेळी मुंबई उच्चन्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यात आले होते. त्यांना रात्री दोन वाजताच्या सुमारास कंपनी बंद करण्यासाठी नोटीस बजावली होती. यावरून त्यांनी यात कोणत्यातरी दोन बड्या नेत्यांचा सहभाग आहे, असे त्यांनी आपले मत ट्विटद्वारे केले होते. तर याच प्रकरणाबाबत मुंबई उच्चन्यायालयाने आता रोहित पवारांना दिलासा दिला आहे. याबाबत रोहीत पवारांनी ट्वीट करत उच्चन्यायालयाचे आभार मानले असून हा विजय सत्तेचा नाही सत्तेचा आहे, असे ट्वीट केले आहे.

काही दिवसांपूर्वी रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो या कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने ७२ तासात कारखाना बंद करा असा आदेश दिला होता. या विरोधात काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी उच्चन्यायालायाकडे याचिका दाखल केली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनी बंद करण्यासाठी नोटीस दिली होती. ही नोटीस आता उच्चन्यायालयाने रद्द केली आहे. न्यायमुर्ती नितीन जमादार आणि मंजुषा देशपांडेंच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. तर प्रदूषण महामंडळाने पुन्हा एकदा नवी नोटीस जारी करावी, असे आदेश उच्चन्यायालयाने दिला आहे. यावर आता रोहित पवारांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

हेही वाचा

सरकारी कंत्राटी भरतीसंदर्भात मोठा निर्णय…

सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड धावल्या सुषमा अंधारेंच्या मदतीला! फडणवीसांकडे केली ‘ही’ मागणी

करीनाच्या ‘द बकिंगहॅम मडर्स’ची चर्चा, लवकरच झळकणार ‘मामी’मध्ये!

ट्वीट करत दिली माहिती 

प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनी बंद करण्यासाठी नोटीस दिली होती. ही नोटीस आता उच्चन्यायालयाने रद्द केली आहे. यामुळे रोहित पवारांना ट्वीट करत माहीती दिली. ‘केवळ द्वेश भावनेतून ‘बारामती ॲग्रो कंपनी’चा प्रकल्प बंद करण्याची दिलेली नोटीस रद्द केल्याबद्दल मा. उच्च न्यायालयाचे मनापासून आभार! अन्यायाविरोधात जेंव्हा न्यायव्यवस्थेकडून न्याय मिळतो तेंव्हा लढण्यासाठी अधिक बळ मिळतं, हेच या निकालाने दाखवून दिलं.. हा लढा सत्तेचा नाही तर सत्याचा आहे… आणि…. सत्य की हार कभी नहीं होती!’ असे ट्वीट करत रोहित पवारांनी माहीती दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी