30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरराजकीयवाचा : संजय राऊत यांच्या अटकेचा घटनाक्रम

वाचा : संजय राऊत यांच्या अटकेचा घटनाक्रम

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर ईडीकडून अटक (Story of Sanjay Raut’s arrest) करण्यात आली. रविवारी (दि. ३१ जुलै २०२२) संपूर्ण दिवसभर संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर ईडीकडून राऊतांना रात्री १२.४५ वाजताच्या सुमारास ईडीकडून अटक करण्यात आली.

गोरेगावमधील बहुचर्चित प्रकल्प असलेल्या पत्राचाळीच्या घोटाळ्यात संजय राऊत यांचे नाव आल्यानंतर ईडीची राऊतांवर टांगती तलवार होती. पण रविवारी ईडीचे पथक राऊतांच्या मुंबईतील भांडुप येथील घरी दाखल झाले. घराची झडती घेतल्यानंतर आणि घरातील चौकशी नंतर संजय राऊत यांनी चौकशीला सहकार्य केले नाही, असे सांगत ईडीकडून संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आले.

रविवारी (दि. ३० जुलै २०२२) सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या दादरमधील गार्डन कोर्ट या इमारतीत असलेल्या घरात ईडीचे अधिकारी दाखल झाले. त्यानंतर सकाळी ७.१५ वाजता राऊतांच्या भांडुपमधील ‘मैत्री’ या बंगल्यावर ईडीचे अधिकारी पोहोचले. आणि ईडीचे अधिकारी पोहोचताच राऊतांच्या बंगल्याबाहेर हालचालींना वेग आला. ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडुपमधील घरी दाखल झाल्यानंतर राऊतांच्या बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांनी ८.४० वाजता जमण्यास सुरुवात केली. आणि राऊतांच्या समर्थनाथ घोषणाबाजींना सुरुवात झाली.

८ वाजून ४६ मिनिटे ते ८ वाजून ५० मिनिटे या कालावधीत संजय राऊत यांच्याकडून चार ट्विट करण्यात आले. ‘मी शिवसेना सोडणार नाही’ असे त्यांनाही ट्विटच्या माध्यमातून सांगितले.

राऊतांच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झाल्यानंतर शिंदे गटातून सर्वात प्रथम आमदार संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया दिली. नऊ वाजता संजय शिरसाठ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊतांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, असे मत व्यक्त केले. त्यानंतर ९ वाजून ३० मिनिटांनी राऊतांच्या भांडुप येथील घरी डीसीपी प्रशांत कदम दाखल झाले. आणि त्यांनी राऊतांच्या बंगल्याबाहेरील सुरक्षेचा आढावा घेतला. राऊतांच्या घरी ईडी कारवाई करण्यासाठी आल्यानंतर साडे दहाच्या सुमारास संजय राऊत यांचे वकील विक्रांत साबणे पोहोचले.

या सगळ्यात स्वतः संजय राऊत हे ११.०७ वाजता त्यांच्या मैत्री या बंगल्यातील खिडकीत आले आणि यावेळी त्यांनी हात उंचावून जमलेल्या त्यांच्या समर्थकांना अभिवादन केले. पण यावेळी ईडीच्या एका अधिकाऱ्याकडून लगेच संजय राऊत यांना आत घेऊन जाण्यात आले. आणि खिडकी बंद करण्यात आलाय. यावेळी संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे सुद्धा उपस्थित होते. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी आढावा बैठकीसाठी जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची पहिली प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी नगर येथे दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राऊतांच्या कारवाईवर ‘कर नाही तर डर कशाला’ अशी प्रतिक्रिया दिली. राऊतांवर ईडीने कारवाईचा बडगा उभारल्यानंतर खासदार राजन विचारे हे ठाण्यातील शिवसैनिकांच्या १० बसेस घेऊन राऊतांच्या समर्थनात मातोश्री येथे दाखल झाले.

यानंतर ईडीकडून संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची तयारी करण्यात आली. आणि बरोबर ३ वाजून ५० मिनिटांनी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. ४ वाजून १० मिनिटांनी ईडी संजय राऊत यांना घेऊन त्यांच्या घराबाहेर पडले. पण याचवेळी संजय राऊत यांच्या घराबाहेर जमलेले शिवसैनिक आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांकडून काही शिवसैनिकांची धरपकड सुद्धा करण्यात आली.

ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर राऊतांनी पाच वाजता पुन्हा एकदा एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी “आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते.. जो कभी हार नहीं मानता! झुकेंगे नही!,” असे लिहून आपले मत व्यक्त केले. यानंतर संजय राऊत यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “मरेन पण, झुकणार नाही” असे माध्यमांसमोर बोलून दाखवले.

ईडीने संजय राऊत यांच्या घरी छापेमारी केल्यानंतर त्यांच्या घरातून ११ लाख ५० हजार रुपये ईडीकडून जप्त करण्यात आले. रात्री पावणे अकरा वाजताच्या दरम्यान, संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्यात झालेल्या संवादाची जी ऑडियो व्हायरल झाली त्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्या. ईडीचे अतिरिक्त संचालक सत्यव्रत कुमार रात्री पावणे बारा वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले. आणि दिवसभरातील सर्वात महत्वाची अशी घडामोड म्हणजे संजय राऊत यांना रात्री ११.३८ वाजता ईडीकडून अखेर अटक करण्यात आली.

दरम्यान, या घटनेचे राज्यात अनेक ठिकाणी पडसाद उमटले. संजय राऊत यांच्या समर्थनात आणि ईडीविरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. तर संजय राऊत यांच्या घराबाहेर सुद्धा काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ज्यामुळे संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी घराच्या बाहेर येऊन शिवसैनिकांना शांत करण्याचा आणि परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा :

संजय राऊतांच्या ईडी कारवाईवर भाजप नेत्यांकडून यच्छेद तोंडसुख

शिवसैनिकांनी केला काळया टोपीवाल्या राज्यपालांचा निषेध

ईडीच्या कारवाया मराठी माणसांवर का ?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!