28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमोठी बातमी :शिवसेनेसोबत युती करण्यास प्रकाश आंबेडकरांची तयारी, पण 'महाविकास आघाडी'मुळे खोळंबा...

मोठी बातमी :शिवसेनेसोबत युती करण्यास प्रकाश आंबेडकरांची तयारी, पण ‘महाविकास आघाडी’मुळे खोळंबा !

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी या युतीबाबत थेट संकेत दिले आहेत. शिवसेनासोबत युती करण्यासाठी प्रकाश आंबेडकर तयार असून महाविकास आघाडीमुळे याप्रकरणात खोळंबा होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांमध्ये युती होण्याच्या चर्चांना उधानं आलं आहे. यामागील विशेष कारण म्हणजे दोन्ही गटातील नेत्यांमध्ये वारंवार सुरू असणाऱ्या भेटीगाठी आणि चर्चा. आजवर या विषयावर कोणत्याही गटाकडून खुलासा करण्यात आला नव्हता. प्रत्येकवेळी या भेटी अराजकिय असून याबाबत केणतीही राजकिय समीकरणे बांधू नये असे आवाहन करण्यात येत होते. मात्र आता थेट वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी या युतीबाबत थेट संकेत दिले आहेत. शिवसेनासोबत युती करण्यासाठी प्रकाश आंबेडकर तयार असून महाविकास आघाडीमुळे याप्रकरणात खोळंबा होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

वंचित बहुजन आघाडीची शिवसेना सोबत युती करण्याबद्दल चर्चा सुरु आहे. या बाबतीत वंचित बहुजन आघाडीच्या बाजुने आम्ही आमचा होकार कळवला आहे. आमच्या वतीने पक्षाचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन व वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुभाष देसाई तसेच त्यांचे काही खासदार यांच्या बरोबर दोन बैठका झाल्या आहेत. त्यात युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली.

हे सुद्धा वाचा

IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा उचलबांगडी

धारावीचं घबाड अदानीच्या घशात!

राज्यातलं खोके सरकार कधीतरी महाराष्ट्रासाठी काम करेल का ?, आदित्य ठाकरेंचा घणाघात

शिवसेना नेते सुभाष देसाई हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना येऊन भेटले. त्यांच्यातही दोन बैठका झाल्या असुन युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली आहे. सध्या या टप्यावर बोलणी झाली आहेत की, आम्ही शिवसेनेला हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे की, वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडीचा भाग बनविणार आणि चार पक्षीय आघाडी करून निवडणूक लढवणार की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे मिळून निवडणुका लढवणार हे स्पष्ट करायला सांगण्यात आले आहे. या बाबतीतला निर्णय त्यांच्याकडून समजला की पुढच्या टप्प्याची चर्चा सुरु होईल. असे मत रेखा ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, 3 महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातील आमदारांना घेऊन मोठ्या प्रमाणावर बंड पुकारले. त्यानंतर सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूर्चीचा त्याग करावा लागला. तेव्हापासून शिवसेना पक्षाला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटनांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहिर केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी अशक्य वाटणारी समिकरण अवघ्या काही महिन्यांत शक्य झाल्याने महाराष्ट्रातील जनता आता या युतीमुळे अचंबित होणार नाही असे मत राजकिय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी