29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयकाम हीच आपली ओळख म्हणजे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी : आमदार रोहित पवार

काम हीच आपली ओळख म्हणजे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी : आमदार रोहित पवार

टीम लय भारी

मुंबई: अमरावती अकोला या राष्ट्रीय महामार्गावर प्रथमच बिटूमिनस काँक्रीटच्या सर्वात लांब रस्त्याची अखंडपणे निर्मितीचा विश्‍वविक्रम नोंदवण्यात आला आहे. ”गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या रस्ताची नोंद झाली आहे. या कामगीरीमुळे अनेकांनी केंद्रीयमंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कामचे कौतुक होतं आहे.

आमदार रोहित पवार यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून एक पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणतात की,  काम हीच आपली ओळख असलेले केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) साहेबांनी आपल्या कामातून अनेक विक्रम केले आहेत. आजही अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्गावरील ७५ कि.मी. रस्ता अवघ्या पाच दिवसात पूर्ण करुन ‘गिनीज बुक’मध्ये या कामाची नोंद केली. याबद्दल गडकरी साहेबांचं मनःपूर्वक अभिनंदन!

अमरावती ते अकोला दरम्यान कामाची गती अतिशय मंदावली असल्याने, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सक्षम आणि गतिमान नेतृत्वात हा विश्‍वविक्रम करण्यात आला.

हे सुद्धा वाचा: 

काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही इथलं सांभाळा : नितेश राणे

Ahead of Rajya Sabha polls, CM Uddhav Thackeray says ‘no matter how hard anyone tries’ all 4 MVA candidates will win

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी