25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीयरोहित पवार यांचं मोठं विधान, शिंदे गटाला धक्का बसणार

रोहित पवार यांचं मोठं विधान, शिंदे गटाला धक्का बसणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. सध्या महायुतीत भाजपसह एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. महायुतीतील नेत्यांकडून तीन इंजिनचं सरकार असा नेहमी उल्लेख होते. पण रोहित पवार पवार यांनी महायुतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘वापरा आणि टाकून द्या’ या धोरणाचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्यामुळे कोणाचा वापर होऊन त्यांना वाऱ्यावर सोडलं जाईल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बरंच काही होऊ शकतं. भाजपमध्ये मोठी इन्कमिंग होईल आणि तिही त्यांच्याच सत्तेतील मित्रपक्षांतून, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

भाजपने सुरुवातीला आमदारांना आमिषे दाखवली, बरीच आश्वासने दिली होती. पण त्या आश्वासनांची पूर्ती होत नसल्यानं ते आमदार नाराज असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील, असं भाकीतही रोहित पवार यांनी वर्तवलं आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाचा भाजपकडून लोकसभेपुरता वापर केला जाईल, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांच्या या नव्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, अजित पवारांनी अमित शाहांची दिल्लीत भेट घेतल्याचीही चर्चा आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले की, ती त्यांची सदिच्छा भेट असू शकते किंवा नाराजी दाखवण्यासाठीही ही भेट असू शकते. एकनाथ शिंदे गटातील अनेकांची अजून मंत्रिपदाची इच्छा पूर्ण झालेली नाही. तर लोकसभेच्या जागेवरूनही काहीवेळा धुसपूस दिसून येते. या सर्व पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

हे ही वाचा

शरद पवार लवकरच सरकारमध्ये; रवी राणांचं स्फोटक विधान

बुलढाणा लोकसभेवर शिवसेनेचा दावा, संजय गायकवाडांचे थेट भाजपला आव्हान

विराटची स्वाक्षरी पाहून ऋषी सूनक काय म्हणाले?

शरद पवारांचा खोटा दाखला व्हायरल

दरम्यान, शरद पवारांचा ओबीसी दाखल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर तो शरद पवारांचा दाखल नाही, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय भाजप असत्याच्या मार्गानं जात असल्याची टीकाही त्यांनी केली. त्यांची सोशल मीडियाची टीम हे सर्व करतेय. असं काही व्हायरल करण्यासाठी पैसे दिले जात असल्याचाही दावा रोहित पवार यांनी केला आहे.

यावरून सुप्रिया सुळे यांनी काय X वरून काय रिपोस्ट केलं आहे, तेही पाहा.

शरद पवारांबाबत आणखी एक दाखला व्हायरल होत आहे. ज्यात ‘मराठा’ असा उल्लेख आहे. त्यामुळे जातप्रमाणपत्र दाखल्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे, एवढं मात्र नक्की!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी