29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयरुपाली पाटील कडाडल्या, "भाडखाऊ भाईजान” ला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे

रुपाली पाटील कडाडल्या, “भाडखाऊ भाईजान” ला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे

टीम लय भारी

पुणे : दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. विद्यार्थांनी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली. विद्यार्थ्यांच्या या गोंधळामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते(Rupali Patil has targeted Hindustani Bhau).

दरम्यान हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठकविरोधात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच आज त्याला बांद्रा कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी त्याच्यावर निशाणा साधला.

रुपाली पाटील ट्विटमध्ये म्हणाल्या की, प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांना भडकवून त्यांच्या जीवाशी खेळणारा “भाडखाऊ भाईजान” ला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे, त्याच्यावर तात्काळ कारवाई करून त्याची मस्ती जिरवावी , अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रुपाली पाटील यांनी ट्वीट करत केली आहे.

हे सुद्धा वाचा

विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोपाखाली हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी केली अटक

अर्थसंकल्प 2022 वर महाविकास आघाडीतील नेत्यांची खोचक टीका

नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली, पोलीस आणि राणेंमध्ये शाब्दिक चकमक

Mumbai: NCP chief Sharad Pawar tests negative for COVID-19

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत असे म्हटले आहे, मात्र सोशल मीडियावर दहावी आणि बारावीची परीक्षा राज्य सरकार ऑनलाईन घेणार आहे अशी अफवा ‘हिंदुस्थानी भाऊ’ ऊर्फ विकास पाठक तरुणाने पसरली होती. याचा परिणाम म्हणजे काल राज्यभर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. हिंदुस्थानी भाऊने आम्हाला बोलावले असून त्यांनीच आंदोलनासाठी निर्धार केल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले.

गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावे असे आपण आवाहन केल्याचे हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक यांनी कबूल केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी