31 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeमहाराष्ट्रअमृतामामी डोक्याने थोड्या कमी आहेत का? फडणवीस साहेब, बाईंना आवरा, समज द्या!

अमृतामामी डोक्याने थोड्या कमी आहेत का? फडणवीस साहेब, बाईंना आवरा, समज द्या!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नव्या भारताचे नवे राष्ट्रपिता ठरवू पाहत आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी जोरदार टीका केली आहे. अमृता फडणवीस यांच्याकडून सातत्याने केली जाणारी वादग्रस्त वक्तव्ये जाणीवपूर्वक केली जातात का, असा सवालही ठोंबरे यांनी टीव्ही 9 वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

“अमृतामामी डोक्याने थोड्या कमी आहेत का? फडणवीससाहेब, बाईंना आवरा, समज द्या!” हा संताप आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांचा. (Rupali Thombare Slams Amruta Fadanvis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नव्या भारताचे नवे राष्ट्रपिता ठरवू पाहत आहेत. त्यावरून ठोंबरे यांनी ही जोरदार टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांच्याकडून सातत्याने केली जाणारी वादग्रस्त वक्तव्ये जाणीवपूर्वक केली जातात का, असा सवालही रुपाली ठोंबरे यांनी टीव्ही 9 वृत्तवाहिनीशी बोलताना केला. पतीच्या सरकारचे अपयश झाकण्यासाठी आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हे सारे मुद्दाम केले जाते की काय, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. देवेंद्र फडणवीस यांनी अमृता मामीला आवरले पाहिजे, ठणकावून सांगितले पाहिजे, असेही ठोंबरे यांनी म्हटले आहे.

“देवेंद्रजी, अमृता मामींना, तुमच्या बायकोला तुम्ही जरा आवरले पाहिजे,” अपेक्षा रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केली. पतीच्या ईडी सरकारची कोणतीही ठोस विकासकामे जनतेसमोर येत नसल्याने तर ही अशी विधाने केली जात नाहीत ना? असा सवाल करून त्या म्हणाल्या, “अगदी नियोजनबद्धपणे ठरवून ही अशी विधाने केली जातात का? त्यामागे काही प्लॅनिंग आहे का? हा सारा प्रचाराचा भाग तर नाही ना? काहीच नेमके कळायला मार्ग नाही.”

वादग्रस्त सोशल इन्फ्ल्यूएन्सर असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेनेही परवाच या विषयावरून फडणवीस बाईंना चिमटा काढला होता. “आता स्वतःला बदलायची वेळ आली आहे,” असा सल्ला केतकीने अनावश्यक वक्तव्ये करून देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने अडचणीत आणणाऱ्या अमृता फडणवीस यांना दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना नव्या भारताचे राष्ट्रपिता ठरवू पाहण्यावरून नेटकरीही अमृताबाईंची चांगलीच खेचत आहेत. आता त्यात रुपाली ठोंबरे-पाटील यांची भर पडली आहे.

अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका या संस्थेतर्फे अभिरूप न्यायालय भरविण्यात आले होते. त्यात अमृता फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांना नव्या भारताचे राष्ट्रपिता ठरविले होते. फडणवीस बाई म्हणाल्या होत्या, “आपल्या देशाला तसे दोन राष्ट्रपिता आहेत. एक जुन्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आणि नवीन भारताचे राष्ट्रपिता नरेंद्र मोदी हे आहेत.”

“देवेंद्र फडणवीस यांनी अमृता मामींना समज द्यायला हवी. फडणवीस-शिंदे सरकारचे अपयश झाकण्यासाठीच तर मुद्दाम ही अशी वक्तव्ये अमृतामामींकडून केली जात नाहीत ना? तुम्ही जर सातत्याने समाजात या अशा गोष्टी ठरवून, हेतूत: बोलणार असाल तर ती नक्कीच चिंतेची बाब मानायला हवी.”

हे सुध्दा वाचा :

अजून तरी माझे मानसिक संतुलन ढासळले नाही ,अमृता फडणवीस

रुपाली पाटील कडाडल्या, भाडखाऊ भाईजान” ला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे

केतकी चितळेचा फडणवीस बाईंना सल्ला; आता स्वतःला बदलायची वेळ आली आहे !

“अमृता वहिनींना देवेंद्रजी थांबवत का नाहीत? फडणवीस साहेब माजी मुख्यमंत्री आहेत. विरोधीपक्ष नेते राहिलेले आहेत. सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मग एका जबाबदार पदावरील व्यक्तीच्या पत्नी असूनही या बाई नेहमी अशा का बरळत राहतात?” असा सवालही रुपाली ठोंबरे यांनी केला आहे. “कोणाला राष्ट्रपिता म्हटले जाऊ शकते, कोण त्या पात्रतेचे होऊ शकते? अशा व्यक्तीने देशासाठी काही तरी बलिदान दिलेले असावे, त्यांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान तरी असावे, ” असा टोला ठोंबरे यांनी लगावला. “मोदीसाहेब भलेही तुम्हाला पित्यासमान असतील, आम्हाला त्यात काहीही अडचण नाही. एखाद्या व्यक्तीला कोणीही आपल्या पित्यासमान दर्जा द्यायला मोकळा आहे. मात्र, त्याला उगाच राष्ट्रपिता ठरवू नका. जाणीवपूर्वक तर हे समाजाच्या मनावर थोपविले जात नाही ना,” अशी शंका रुपाली ठोंबरेंनी उपस्थित केली.

“राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. मुद्दाम जुने-नवीन शिवाजी महाराज हा वाद उपस्थित केला. आता अमृता मामींनी पुन्हा जुने आणि नवीन राष्ट्रपिता अशी चर्चा घडवून आणली. या अशा मुद्द्यांवरून तुम्ही महाराष्ट्राचा कोणता विकास साधणार आहात ?” असा सवालही रुपाली ठोंबरे यांनी एकनाथ-देवेंद्र यांच्या ईडी सरकारला केला.

Amruta Fadanvis, Rupali Thombare Slams, RashtraPita Remark, अमृतामामी

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी