30 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरराजकीयAndheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रंगला ऋतुजा लटके...

Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रंगला ऋतुजा लटके विरुद्ध ‘नोटा’चा सामना

गेल्या एक महिन्यापासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा एकहाती विजय झालेला आहे. 3 नोव्हेंबरला यासाठीचे मतदान घेण्यात आले होते.

गेल्या एक महिन्यापासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या (Andheri East Bypoll Election) पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा एकहाती विजय झालेला आहे. 3 नोव्हेंबरला यासाठीचे मतदान घेण्यात आले होते. याचा निकाल रविवारी (ता. 6 नोव्हेंबर) जाहीर करण्यात आला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून विजयी झालेले रमेश लटके यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यानंतर राज्यात घडलेल्या सत्तांतराच्यानाट्यामुळे या विधानसभेची पोट निवडणूक लांबणीवर पडली. पण ऑक्टोबर महिन्यात अंधेरी पूर्व विधानसभेची पोट निवडणूक जाहीर करण्यात आली. यानंतर याठिकाणी देखील हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी भाजपकडून 2019 चे याच विधानसभेतील अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंतीपर पत्र पाठवल्याने भाजपच्या पक्षश्रेष्टींच्या आदेशानंतर मुरजी पटेल यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोट निवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांना 65 हजारांहून अधिक मते मिळाली. तर नोटाला दुसऱ्या क्रमांकाची 12 हजारापेक्षा अधिक मते मिळाली. परंतु या निवडणुकीत ऋतुजा लटके यांना आव्हान दिलेल्या 6 अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मते मिळाली. ज्यामुळे या निवडणुकीत ऋतुजा लटके विरुद्ध नोटा असा सामना रंगलेला पाहायला मिळाला. जर भाजपचे मुरजी पटेल यांच्याकडून उमेदवारी मागे घेण्यात आली नसती तर कदाचित या निवडणुकीचे पूर्ण चित्र वेगळे असते.

ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याचा विषय चांगलाच रंगला. ऋतुजा लटके या महानगरपालिकेत कार्यरत होत्या. परंतु निवडणुकीसाठी उभे राहण्याकरिता त्यांना आपला राजीनामा देणे आवश्यक होते. परंतु उमेदवारी अर्ज भारण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना देखील ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला नव्हता, ज्यामुळे अखेरीस कोर्टाची पायरी चढावी लागली. पण न्यायालयाकडून त्यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर लटके यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांचे नाव निश्चित असताना भाजपकडून मुरजी पटेल यांची घोषणा करण्यात आली. मुरजी पटेल यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिण्यात आले. “माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल,” असे लिहिले होते. यानंतर भाजपकडून दुसऱ्या दिवशीच मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला होता. परंतु यानंतर मुरजी पटेल यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी दर्शविली होती.

Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ऋतुजा लटकेंना सहा उमेदवारांचे आव्हान; गुरुवारी होणार मतदान

Uddhav Thakeray : ‘मध्यवर्ती निवडणूकांसाठी तयार रहा!’ उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर महाराष्ट्राचं राजकारण हादरलं

Maharashtra Politics : आमदार फुटीच्या वक्तव्यावरून काँग्रेस-ठाकरे गटात ‘तू-तू.. मैं-मैं’

दरम्यान, या सर्वात अंधेरी पूर्व विधानसभेतील या राजकीय नाट्यामुळे बहुतांश उमेदवारांनी नोटाला मतं देणे पसंत केल्याचेच दिसून आले आहे. ज्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या उमेदवारांपेक्षा नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. ऋतुजा लटके यांचा या निवडणुकीत एकहाती विजय जरी झाला असला तरी नोटाला मिळालेल्या मतांची सर्वाधिक चर्चा होत आहे.

या निवडणुकीतून भाजपने आपला उमेदवार जरी मागे घेतलेला असला तरी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. या निवडणुकीत नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याने यामधून जनतेने आपला रोष व्यक्त केला असल्याचे मत आशिष शेलार यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.

अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी महत्वाची निवडणूक होती. या निवडणुकीत जर भाजपने उमेदवार उभा केला असता तर ती आणखीनच रंगतदार आणि प्रभावी बनली असती. ज्यामुळे या निवडणुकीतून ठाकरे गटाची खरी चाचपणी अर्थात एक प्रकारची लिटमस टेस्टच झाली असती. पण भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ठाकरे गटाला एक प्रकारचा मोठा दिलासा मिळून या निवडणुकीतील त्यांची स्पर्धा मात्र कमी झालेली पाहायला मिळाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी