27 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरराजकीयमहाराष्ट्रातील तरुणांच्या तोंडचा घास पळवला हाच मुंबईचा भाग्योदय का ?

महाराष्ट्रातील तरुणांच्या तोंडचा घास पळवला हाच मुंबईचा भाग्योदय का ?

मुंबई महापालिकेवरचा शिवसेनेचा भगवा उतरवता येईल का? याच भविष्यातील विचाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. मुंबईच्या उज्वल भविष्यासाठी ते मुंबई अवतरत आहेत हे सर्व थोतांड आहे, अशी जहरी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' या दैनिकातून करण्यात आली आहे. यावेळी एकनाथ शिंदे गटावर शरसंधान करताना त्या गटाला बेडकाची उपमा देत त्या बेडकाची आता अखेरची 'डराव डराव' सुरु असल्याचे यात म्हंटले आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुंबई नगरी भाजपच्या झेंड्यांनी सजली आहे. त्यात कोठेतरी स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी मिंधे गटाचे प्रयत्न सुरु आहेत. पण मगरीने बेडकाला गिळले असून मगरीच्या जबड्यात या बेडकाची अखेरची 'डराव डराव' सुरु आहे अशा बोचऱ्या शब्दांत शिंदे गटावर हल्ला चढविला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज गुरुवारी मुंबईत विविध विकासकामांच्या उद्घटनासाठी मुंबई येत आहेत. नरेंद्र मोदींचे शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून खास शैलीत स्वागत करण्यात आले आहे. ‘नरेन्द्र मोदींचे स्वागत असो’ या मथळ्याखाली भाजप आणि शिंदे (Eknath Shinde) गटावर आगपाखड करण्यात आली आहे. केंद्राने महाराष्ट्रातून सव्वादोन लाख कोटींचे प्रकल्प पळवून नेले. राज्यातील बेरोजगार तरुणांच्या तोंडाचा घास पळवून नेला. यालाच मुंबई-महाराष्ट्राचा भाग्योदय म्हणायचे का? असा रोकडा सवाल मुखपत्रातून विचारण्यात आला आहे. या दौऱ्यानिमित्त भारतीय जनता पक्षाने सर्वत्र ‘विकास पुरुष’ असे नरेंद्र मोदींचे मोठमोठे कटआऊट लावले आहेत. या वातावरणनिर्मितीमागचा फोलपणा उघड करताना यात म्हंटले आहे की, पंतप्रधान येतील मुंबईचा कायापालट करतील असे भाजपने जाहीर केले आहे. मुंबईचे आर्थिक आणि औद्योगिक महत्व कमी करून केंद्राने हा कायापालट याआधीच सुरु केला आहे. (‘SAAMANA’ Criticize on Narendra Modi Mumabi visit)

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान मोदींचा उद्या मुंबई दौरा; वाहतुक व्यवस्थेत असतील ‘हे’ बदल

दावोसमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणली ठाकरे सरकारच्या दुप्पट गुंतवणूक

मोदींच्या काळात आर्थिक विषमतेत वाढ

हा तर भाजपचा दुतोंडीपणा
ज्या योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती, नियोजन आराखडा करण्यात आला होता, कायदेशीर अडथळे दूर करण्यात आले, त्याच सर्व प्रकल्पांचे भूमिपूजन नरेंद्र मोदी करत आहेत. एकीकडे माझापालिकेने म्हणजेच शिवसेनेने केलेल्या कामाचे श्रेय भाजपने घ्यायचे त्या कामांचे उदघाटन पंतप्रधानाच्या हस्ते घडवून राजकीय सोहळे साजरे करायचे. त्याचवेळी महापालिकेच्या कामासानही चौकशी ‘कॅग’ वैगरेंकडून करून महापालिकेची बदनामी करायची, अशा शब्दांत ‘सामना’मध्ये भाजपच्या दुटप्पीपणावर टीका केली आहे.

विद्यापीठाची भींत तोडून मुंबईच्या भाग्योदयाची सुरुवात
नरेंद्र मोदींच्या सभेसाठी येणाऱ्या लोकांच्या पार्किंगच्या सोयीसाठी मुंबई विद्यापीठाची संरक्षक भिंत तोडण्यात आली त्यावर ‘सामान’मध्ये उपरोधक भाष्य केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनांची पार्किंगची सोय मुंबई विद्यापीठातील आवारात करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यापीठाची संरक्षण भिंत मनमानीपणे पाडण्यात आली. या मुजोरीविरोधात ‘सामनामध्ये’ समाचार घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्यासाठी गर्दी करण्याचे नियोजन आहे. येणाऱ्यांच्या गाड्या-घोड्यांच्या पार्किंगची सोय व्हावी म्हणून कालीना येथील मुंबई विद्यापीठाची संरक्षक भिंतच तोडण्यात आली. त्यावरून वाद निर्माण झाला. मुबईच्या भाग्योदयाची सुरुवात विद्यापीठाची भिंत तोडून झाली. मुंबईतील एका एका वास्तूंवर असे हातोडे घातले जात आहेत तरी आमच्या पंतप्रधानाचे स्वागत असो !

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी