29 C
Mumbai
Monday, May 8, 2023
घरराजकीयमाजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; साई रिसॉर्ट...

माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; साई रिसॉर्ट प्रकरणी कारवाई

दापोलीतील एका वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणात इडीच्या अधिकाऱ्यांनी रिसॉर्टचे मालक आणि उद्योजक सदानंद कदम यांना आज शुक्रवारी पहाटे ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. रिसॉर्टचा मुद्दा समोर असला तरी एका राजकीय पक्षाच्या सभेला आर्थिक पाठबळ दिल्यामुळे या कारवाईला वेग आला असल्याची चर्चा आहे. दरम्यान, ईडीनं या कारवाईची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कारवाईच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.

जिल्ह्यातील वादग्रस्त साई रिसॉर्टने मोठी राजकीय खळबळ उडवली आहे. या रिसॉर्टची वेगवेगळ्या पातळीवर चर्चा आहे. या प्रकरणी इडीकडून एका उद्योजकाला ताब्यात घेण्यात आले असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. विविध उद्योगात यशस्वी असलेल्या या उद्योजकावर राजकीय वक्रदृष्टी असल्याने अशा पद्धतीची कारवाई अपेक्षितच केली जात होती. रिसॉर्ट हे समोर दिसणारे कारण असले तरी त्यामागे अन्य काही कारणेही असल्याची मोठी चर्चा आहे.

एका राजकीय पक्षाच्या सभेला माणसे आणण्यासह सर्व प्रकारचा खर्च या उद्योजकाने केला आहे. राजकारणात कोठेही थेट सहभागा नसलेल्या या उद्योजकाचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे या कारवाईला अधिक गती देण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्याचप्रमाणे साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांनी याआधीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे सगळं सुरू असतानाच कदम यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. कदम यांच्या अटकेमुळं अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : अखेर ईडीने किरीट सोमय्यांचा हट्ट पुरविला !

Anil Parab Bail : अनिल परब यांना मोठा दिलासा; रिसॉर्ट प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

मोदींच्या हुकूमशाहीचा देशातील नेत्यांकडून निषेध; सीबीआय, ईडीचा गैरवापर होत असल्याचा पत्राद्वारे आरोप

नेमकं प्रकरण काय?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडण्यात येत असल्याने पर्यावरणाची हाणी होत असल्याचे ट्विट केले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.  त्याचप्रमाणे काही महिन्यांपासून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी वेगवेगळे दावे करत आहेत. हा रिसॉर्ट चुकीच्या पद्धतीने बांधली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सतत होणाऱ्या कारवायांमुळे हे रिसॉर्ट प्रकरण गेले अनेक दिवस वादात सापडले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी