28 C
Mumbai
Monday, November 21, 2022
घरराजकीयSambhaji Bhide : संभाजी भिडे समाजातली विकृती; काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र

Sambhaji Bhide : संभाजी भिडे समाजातली विकृती; काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र

शिवप्रतिष्ठाचे संस्थापक संभाजी भिडे यांनीही एका महिला पत्रकाराला ‘आधी कुंकू लाव मग तुझाशी बोलतो’, या विधानाचा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निषेध करत भिडे यांच्यावर जोरादार टीका केली. पटोले म्हणाले, महिलेला तुच्छ लेखणाऱ्या अहंकारी पुरुषी मानसिकतेतून आलेला हा प्रकार असून भिडे ही समाजातली विकृत्ती आहे.

शिवप्रतिष्ठाचे संस्थापक संभाजी भिडे यांनीही एका महिला पत्रकाराला ‘आधी कुंकू लाव मग तुझाशी बोलतो’, या विधानाचा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निषेध करत भिडे यांच्यावर जोरादार टीका केली. पटोले म्हणाले, महिलेला तुच्छ लेखणाऱ्या अहंकारी पुरुषी मानसिकतेतून आलेला हा प्रकार असून भिडे ही समाजातली विकृत्ती आहे. अशा विकृत्तीला आळा घातला पाहिजे परंतु पुरोगामी महाराष्ट्राच्या मंत्रालयात अशा विकृत्तींना मानाचे स्थान दिले जाते हे त्याहून दुर्दैवी आहे.
यावेळी पटोले म्हणाले, महिलेचे कर्तृत्व कुंकू लावण्याने सिद्ध होते का? तिचे काम व कुंकू याचा काय संबंध आहे? संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराचा केलेला अपमान हा समस्त महिला वर्गाचा अपमान आहे. महाराष्ट्राला आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे यांच्यासारख्या थोर व महान पत्रकारांचा वारसा लाभलेला आहे. याच महाराष्ट्रात पत्रकारांचा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सत्ताधा-यांकडून अपमान केला जात आहे हे योग्य नाही.
प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, असे सांगताना नाना पटोले म्हणाले, सरकारला जाब विचारणे, त्यांच्या धोरणांवर टीका करणे हे त्यांचे कामच आहे परंतु लोकशाही व संविधानाला न मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पत्रकारांना HMV (His Masters Voice) असे संबोधित करून गुलामाची उपमा देणे हा पत्रकारांवर दबाव टाकण्याचा अश्लाघ्य प्रकार आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडूनच असा प्रकार होत असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून भाजपा व देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली पाहिजे.
हे सुद्धा वाचा :

LayBhari Exclusive : ‘टिकली लावावी की नाही, हे तिसऱ्याने सांगण्याची आवश्यकता नाही!’; अभिनेत्री अनिता दाते हिची प्रतिक्रिया

Shivsena Leader Murder : भरदिवसा शिवसेना नेत्याची हत्या! अज्ञातांकडून गोळीबार

Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांना ‘टीकली’वरील वक्तव्य भोवणार? राज्य महिला आयोगाने बजावली नोटीस!

पटोले म्हणाले की, २०१४ साली केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून सर्वच यंत्रणांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. सरकारच्या इशाऱ्यावर त्यांना नाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांचा HMV असा उल्लेख करणे व त्याच पक्षाचा आमदार पराग शहा पत्रकारांना चाय- बिस्कुटवाले म्हणत अपमान करतो ही सत्तेची मस्ती चढल्याचा प्रकार आहे.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!