34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयसंभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजेंनी समन्वयकांना खडसावलं

संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजेंनी समन्वयकांना खडसावलं

टीम लय भारी

मुंबई: आज तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली आहे. या आंदोलनात सुरुवातीपासून संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे त्यांच्या सोबत आहेत. त्या भावूक झाल्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.(Sambhaji Raje’s wife Sanyogitaraje scolded the coordinators)

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. मात्र तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आले आहे. या आंदोलनात सुरुवातीपासून संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे भाऊक होऊन त्यांनी आपल्या पतीस अजून मानसिक त्रास देऊ नका, अशी विनंती केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.

आज तिसऱ्या दिवशी देखील संयोजिताराजे त्यांच्या सोबत होत्या. यावेळी त्यांनी समन्वयकांना सौम्य शब्दात खडसावलं. तसेच त्या शिष्टमंडळाला विनंती करत म्हणाल्या की, तोडगा काढूनच या. तसंच राजेंना कोणीही मानसिक त्रास देऊ नका, अशीही विनंती त्यांनी केली. हायपोप्लासियात गेल्यावर त्यांना मानसिक त्रास देणं चांगलं नाही, असं त्या म्हणाल्या आहेतं

हे सुद्धा वाचा

खासदार संभाजी राजेचे आझादमैदानात उपोषण सुरू

अजित पवार आणि शाहू महाराजाच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी व्यक्त केले मत…

संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

Chhatrapati Sambhajiraje begins indefinite hunger strike for Maratha quota

तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांचा ब्लड प्रेशर, शुगर कमी झाली आहे, मात्र त्यांनी औषधं घ्यायला नकार दिला आहे. संभाजीराजे यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हणाले की, 60 तास झालेत त्यांना आमरण उपोषण करत आहेत. त्यांचं शुगर आणि रक्तदाब कमी झालं आहे. सोबतच हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ते उपोषणावर असल्यानं त्यांनी यासंदर्भात नकार दिला आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

22 मागण्यांपैकी 6 मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात अशी विनंती खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. ते म्हणाले ,मी गरीब मराठ्यांची अवस्थापाहिलीय. त्यावर त्यांची ही भुमिका ठाम आहे असे दिसत आहे.  याआधी देखील असे निर्णय झाले आहेत. माझ्या बोलण्यात काही वेगळं नाही आहे. मला त्रास होतोय, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत हे उपोषण न्याव. मात्र सरकारकडून बोलवणं आलंय, असही ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी