33 C
Mumbai
Wednesday, May 24, 2023
घरराजकीयतिथे हजर असतो तर संजय राऊतांना मारले असते ; संदीप देशपांडे संतापले

तिथे हजर असतो तर संजय राऊतांना मारले असते ; संदीप देशपांडे संतापले

निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्य बाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात वाकयुद्ध सुरु झाले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्यानंतर राजकीय धुळवड सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी विरोधकांचे तळवे चाटले, अशी बोचरी टीका केल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, “मग आता सध्याचे मुख्यमंत्री काय चाटत आहेत? ढुंगण चाटत आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही.” या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत यांनी जे अपशब्द वापरले त्यावर देशपांडे यांनी आक्षेप नोंदविला असून आपण जर त्या ठिकाणी असतो तर त्यांना (संजय राऊत) मारले असते, अशी आक्रमक भाषा वापरली आहे. (Sandip Deshpande criticized Sanjay Raut)

Sandip Deshpande criticized Sanjay Raut

शिवसेना आणि धनुष्य बाण एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकर गटातील नेत्यांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर तोंडसुख घेतले. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. या पार्श्वभूमीवर रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी विरोधकांचे तळवे चाटले असे ते म्हणाले. त्यावर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अमित शाह यांच्यावर प्रहार केला आहे. ते म्हणाले, “मग सध्याचे मुख्यमंत्री आता काय चाटत आहेत ? आता काय चाटत आहेत, ढुंगण चाटत आहेत का? अशी चाटुगिरी महाराष्ट्रात यापूर्वी कधीच झाली नव्हती. चाटुगिरीचे हे टोक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा यांना अधिकार नाही.”

हे सुद्धा वाचा

‘शिवसेना, पक्षचिन्हा’बाबत ठाकरे गटाची पुढील भूमिका काय? सर्वोच्च न्यायालयात जाणार खटला; वाचा सविस्तर

शिवरायांच्या प्रतिमेची तोडफोड, हार कचरापेटीत फेकला ; JNU मध्ये राडा

संतापजनक : महसूल, आरोग्य विभागाचा नालायकपणा ; शिवाजी महाराजांचा अनमोल ठेवा धुळीत

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी