26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरराजकीयबंडखोर मुख्यमंत्री आणि त्यांचे फुटीर आमदार महाराष्ट्राचे तुकडे करण्याच्या कुटील कारस्थानाचे ईडीपिडीत...

बंडखोर मुख्यमंत्री आणि त्यांचे फुटीर आमदार महाराष्ट्राचे तुकडे करण्याच्या कुटील कारस्थानाचे ईडीपिडीत पाईक, संजय भोसलेंचा थेट आरोप

टीम लय भारी

सातारा : शिंदे सेनेने आपले वेगळे अस्तित्व निर्माण करीत आता आपला शिवसेनेवर हक्क सांगण्यास सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे यांना डावलून कायम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाची ढाल करीत आपणच शिवसेनेचे खरे पाईक असल्याचे जनतेला भासविणे सुरू आहे. परंतु ठाकरे कुटुंबियांसाठी ठामपणे उभे राहणाऱ्या शिवसैनिकांचा मात्र वेगळाच रोष पाहायला मिळत आहे. दरम्यान “ठाकरेंसाठी जिवाची बाजी लावणारांची सातार्‍यात कमी नाही”, असे निक्षून सांगणाऱ्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी शिंदे गटाविरुद्ध आता दंड थोपडले आहेत.

एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले म्हणाले, बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मूळ जिल्हा साताऱ्यामध्ये मा.उध्दवजी ठाकरे कुटुंबीयांसाठी जिवाची बाजी लावणार्‍या शिवसैनिकांची कमी नाही, हे सर्व येणारा काळचं दाखवून देईल असे म्हणत एकनाथ शिंदे गटाला भोसले यांनी खुले आव्हान दिले आहे.

पुढे भोसले म्हणतात, “शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले आमदार शंभूराजे देसाई आणि महेश शिंदे यांनी बंडोबामध्ये सामील होत ईडी पिडीत सरकारची बोळवन करताना ज्या काही भिमगर्जना केल्या आहेत, याला सातारचे शिवसैनिक येणार्‍या काळात रस्त्यावरच्या लढाईतच जशास तसे उत्तर देतील. मा.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आत्मसात केलेले आम्ही कडवट शिवसैनिक असून सत्ता,पैशांचा मोह व लालसेपोटी मातोश्रीसोबत बेईमानी करणे आमच्या रक्तातच नाही”, असे भोसले यांनी स्पष्टपणे यावेळी सांगितले आहे.

“मा.शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे अंतिम आवाहन “मला सांभाळलात, माझ्या उध्दव, आदित्यला सांभाळा, साथ द्या” हे शब्द नव्हे तर आदेश घेऊन मी स्वत: सन 2017 साली “शिवसैनिक निर्धार भेट व संकल्प यात्रा” माझी आर्थिक परिस्थिती नसताना देखील काढली आणि महाराष्ट्रभर वेड्यासारखा दौडलो, ही आमची बाळासाहेबांप्रती निष्ठा आहे. या निष्ठेला छेद देईल अशी कोणतीच सत्ता आणि संपत्ती जन्माला येऊच शकत नाही”, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह इतर बंडखोर आमदारांना कडव्या शब्दांत भोसले यांनी खडे बोल सुनावले आहेत.

दरम्यान, पुन्हा एकदा याच शब्दांची व आवाहानाची आठवण करुन देण्यासाठीच भाबड्या आशेने संकटाची पर्वा न करता मोदी-शहांच्या गुवाहाटीतील चक्रव्यूहात दडलेल्या आमदार यांना त्यांच्याच सैन्यात घुसून माघारी फिरा असे धाडसाने सांगणारे आम्ही मातोश्रीचे खरे पाईक व कट्टर शिवसैनिक असल्याचा मला आजही अभिमान असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.

बंडामुळे निराश झालेले संजय भोसले उद्वगतेने म्हणाले, “बंडखोर मुख्यमंत्री आणि त्यांचे फुटीर आमदार आजही आम्हीच हिंदुह्नदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांचे खरे शिवसैनिक असल्याच्या ज्या काही बतावण्या व केविलवाणा प्रयत्न करत आहेत ती एक नौटंकी असून, दोन गुजरात्यांच्या स्क्रिप्ट मध्ये ठरल्या प्रमाणे महाराष्टाचे तुकडे करण्याच्या कुटील कारस्थानाचे ते ईडीपिडीत पाईक आहेत, अशा दलबदलूंना कट्टर शिवसैनिक भिक सुद्धा घालणार नाहीत असे म्हणून उद्धव ठाकरेंविरोधात, शिवसेना पक्षाविरोधात बंड पुकारणाऱ्यांना संजय भोसले यांनी ठणकावून सांगितले आहे.

कोण आहेत संजय भोसले?

संजय भोसले हे कट्टर शिवसैनिक असून ते साताऱ्यात शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचे पदभार सांभाळत आहेत. मातोश्री विषयी अत्यंत आदर, आणि ठाकरे घराण्याविषयी असलेली आस्था असलेले कडवट सैनिक आहेत. जेव्हा एकनाथ शिंदेंसह अनेक शिवसेना आमदारांनी बंड पुकारले तेव्हा उद्विग्न झालेले हे भोसले थेट गुवाहटीमध्ये हातात ‘एकनाथ शिंदे (भाई) परत चला, उद्धव, आदित्यजींना साथ द्या’ अशा प्रकारचा बोर्ड घेऊन पोहोचले होते. परंतु त्यांची हाक त्यावेळी ऐकली गेली नाही पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक केली. दरम्यान पुन्हा संजय भोसले यांनी शिंदे गटाविरोधात आता आवाज उठवायला सुरूवात केली असून आता थेट त्यांना शिवसैनिक येणार्‍या काळात रस्त्यावरच्या लढाईतच जशास तसे उत्तर देतील असे आव्हान दिले आहे.

हे सुद्धा वाचा..

प्रा. हरि नरके यांची ‘ही‘ गोष्ट…. नक्कीच वाचा

ऐन पावसाळ्यात पुण्यात आगडोंब, 12 घरे संपुर्ण जळून खाक

‘यांचा दाखवायचा आणि करायचा चेहरा वेगळा…’, पडळकरांचा नेमका रोख कोणाकडे?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!