31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरराजकीय...तर भाजपचे 10 खासदारही निवडून येणार नाहीत, संजय राऊतांचे आव्हान

…तर भाजपचे 10 खासदारही निवडून येणार नाहीत, संजय राऊतांचे आव्हान

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातून 10 खासदारही निवडूण येऊ शकत नाहीत याउलट महाविकास आघाडी 220 खासदार निवडून आणू शकते असं भाकित वर्तवलं. त्यांच्या या विधानानंतर आता महाराष्ट्राच्या राजकिय वर्तूळात चर्चांना उधानं आलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष यमुलाखतीमध्ये संजय राऊत यावेळी बोलत होते.

आपल्या आक्रमक बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात संभाव्य युतीवर भाष्य केले. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातून 10 खासदारही निवडूण येऊ शकत नाहीत याउलट महाविकास आघाडी 220 खासदार निवडून आणू शकते असं भाकित वर्तवलं. त्यांच्या या विधानानंतर आता महाराष्ट्राच्या राजकिय वर्तूळात चर्चांना उधानं आलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष यमुलाखतीमध्ये संजय राऊत यावेळी बोलत होते.

संजय राऊत हे नुकतीय तुरुंगवारी करून पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्येच पाहायला मिळत आहे. ते पुन्हा आपल्या कामाला लागल्यापासून त्यांच्यातील आक्रमकपणा निवळला असल्याची टीका सातत्याने केली जात होती. मात्र आता संजय राऊत पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या रुपात परतले असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे ते पुन्हा एकदा त्याच जोशात भाजपाला शिंगावर घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशांतच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभरात चर्चेत असलेल्या शिवशक्ती आणि भिमशक्ती अर्थात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील संभाव्य युतीवर संजय राऊतांनी भाष्य केले.

हे सुद्धा वाचा

जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या सरपंच आणि पंचायत सदस्यांना आता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक, महाराष्ट्र सरकारचा निर्णय

ऋतुराज गायकवाड पुन्हा ठरला महाराष्ट्राचा तारणहार ! अंतिम सामन्यात धमाकेदार प्रवेश

सरसेनापती प्रतापराव गुजरांची गौरवगाथा उलघडणार; ‘रावरंभा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

आंबेडकर या नावाला केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशात एक वजन आहे. ठाकरे या नावाप्रमाणेच आंबेडकर या नावाचेही राजकारणात मोठ्या प्रमाणावर वजन आहे. त्यामुळे जेव्हा राजकारणातले हो दोन ब्रँड एकत्र येतील तेव्हा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून आपले 10 खासदार निवडून आणणे देखील अवघड होईल असं म्हणत संजय राऊत यांनी यावेळी थेट भाजपला आव्हान दिल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी बोलताना संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीने शिवसेने सोबत एकत्र येत असताना त्यांनी महाविकास आघाडी मध्येही समाविष्ट व्हावे असा सल्ला देणार असल्याचेही सांगितले.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शरद पवारांवर देखील भाष्य केले. संजय राऊत म्हणाली की, शरद पवार या महारष्ट्राचे आणि देशाचे महत्वाचे नेते आहेत. ते चार वेळा मुख्यमंत्री होते. सामाजिक, राजकीय, कृषी, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड कार्य केलेय. शरद पवारांकडून राजकीय विद्यार्थ्यांना खूप काही शिकण्यासारखे आहे. शरद पवरांकडून काही गोष्टी शिकण्याची संधी मिलाली तर त्यात गैर काय? शरद पवारांविरोधात अत्यंत घाणेरडे आरोप केले जातात. सिल्वर ओक आणि मातोश्री यांची युती झाली असेल तर कुणाच्या पोटात दुखण्याचे कारण काय? अशा शब्दांत राऊतांनी एकनाथ शिंदे आणि सेनेतून फुटलेल्या 40 आमदारांवर निशाणा साधला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!