28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री साहेबांनी काही खोके बेळगावला पाठवले; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री साहेबांनी काही खोके बेळगावला पाठवले; संजय राऊतांचा गंभीर आरोप

विधानसभेच्या निवडणुकांसाठी आज (10 मे) कर्नाटकात मतदान सुरू झालं आहे. दिग्गज नेतेमंडळींसह नागरिकांनीही सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली आहे. मतदान करुन हक्क बजावण्यासाठी जनता राजकीय मैदानात उतरली आहे. यंदा महाराष्ट्रातील नेतेमंडळही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्नाटकातील प्रचारात दिसून आली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंगलोरला जाऊन प्रचार केला. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावला खोके पोहोचवल्याचा गंभीर आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे.

सीमाभागात बेळगाव एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. तर, मराठी माणसालाच मतदान करा, असे राज ठाकरेंनी म्हटलंय. त्यामुळे, सीमाभागात नेमकं काय होणार, इथे कोणाचा वरचष्मा ठरणार हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदेंनी बेळगावला खोके पाठवल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय.

आज कर्नाटक राज्यात विधान सभा निवडणुका होत आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृह मंत्री शहा यांनी घाम आणि पैसा गाळून देखील भाजपचा दारुण पराभव होत आहे. हा 2024साठी शुभ शकुन आहे. दुःख इतकेच की महाराष्ट्राचे सध्याचे मिंधे राज्यकर्ते यांनी आपल्या सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कारस्थाने केली. स्वतःला शिवसेना म्हवणून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मंगलोरमार्गे काही खोके बेळगावात पाठवून एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शर्थ केली, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी मतदानादिवशीच केलाय.

देशात भाजपची सत्ताधारी लाट कायम ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी कर्नाटकमध्ये सभांचा धडाका लावल्याचं दिसून आलं. तर, काँग्रेसकडूही कर्नाटकमध्ये प्रचाराचे धुमशान चालू असल्याचे पाहायला मिळालं. सीमाभागातील उमेदवारांसाठी भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी प्रचार केला. तर, मुख्यमंत्री शिंदेंनी मंगळुरूत रॅली घेत भाजप उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन केल आहे. मात्र संजय राऊत यांनी ट्विट करुन केंद्रातील मोदी-शहांच्या नेतृत्त्वावर आणि राज्यातील मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. तसेच, महाराष्ट्राशी ही गद्दारीच आहे.. मराठी माणूस हे लक्ष्यात ठेवील, असेही राऊत यांनी म्हटलं.

हे सुद्धा वाचा : 

अजितदादांमुळेच मी..; त्या विधानानंतर अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा

खारघर- तुर्भे लिंक रोड तीन वर्षांत पूर्ण होणार

शरद पवार म्हणाले, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, आर. आर. पाटीलांनी कर्तृत्व सिद्ध केले

Sanjay Raut on CM Eknath shinde, Sanjay Raut allegations on CM Eknath shinde sent some boxes to Belgaum, Sanjay Raut, CM Eknath shinde, shivsena

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी