29 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांना परिणाम भोगावे लागतील; अब्दुल सत्तारांचा इशारा

संजय राऊतांना परिणाम भोगावे लागतील; अब्दुल सत्तारांचा इशारा

निवडणूक आयोगाने धनुष्य-बाण हे चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर जहरी भाषेत टीकास्त्र सोडले. या निर्णयासाठी २००० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला होता. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेदेखील नाव गोवण्यात आले होते. त्यांनतर शिवगर्जना यात्रेदरम्यानही संजय राऊत यांनी निवडणूक अयोगावर निशाणा साधला. ठाकरे गटाने पुन्हा निवडणूक आयोगावर बोचऱ्या शब्दांत टीका केली असून निवडणूक आयोग आपल्या राजकीय मालकासाठी ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’ म्हणून काम करत असल्याचा टोला लगावला आहे. राऊत यांच्या सततच्या टीकेने सत्ताधारी पक्षातील नेते डिवचले गेले असून संजय राऊत यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. राऊतांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे सूचक वक्तव्य सत्तर यांनी केले आहे. (Sanjay Raut will face the consequences)

एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांचा चोरमंडळ असा उल्लेख केल्यानंतर हा विधिमंडळाचा अपमान असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला होता. त्यानंतर राऊत यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला. या प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी हक्कभंग समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री अब्दुल सत्तर यांनी संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. त्यांचे सगळे साम्राज्य लयास गेले, त्यामागे संजय राऊतच आहेत. त्यांनी राजकीय समीकरणं कुठे जोडायचे? कसे जोडायचे? काय बोलायचं? कुठे बोलायचं? कसं बोलायचं? बोलायचे परिणाम काय? याची जाणीव न ठेवता ते बोलतात. हे चुकीचं आहे. राज्यात विधानसभा-परिषदेचा सन्मान करायला हवा, अशी टीका सत्तर यांनी राऊत यांच्यावर केली आहे.

आमच्या मतांवरच ते खासदार झाले
संजय राऊत यांच्यावर सत्तर यांनी हल्लाबोल केला असून ते आमच्या मतांवरच राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत असे म्हंटले आहे. संजय राऊत यांना वाटतंय की आपण राज्यसभेवर आहोत म्हणून दुसऱ्याला काहीही बोलू शकतो. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचा ५०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड करणार; सोमय्यांचा पुन्हा इशारा

IAS Transfer : आयएएस डॉ. निधी पांडे यांची अमरावती विभागीय आयुक्तपदी बदली

मी कुटुंबाचाच नाही, तर महाराष्ट्राचा विचार करतो; शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी