33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeराजकीयSanjay Raut :संजय राऊत प्रकरणी स्वप्ना पाटकर यांना कोर्टाकडून दिलासा नाही

Sanjay Raut :संजय राऊत प्रकरणी स्वप्ना पाटकर यांना कोर्टाकडून दिलासा नाही

संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीमध्ये संजय राऊत यांच्यावर धमकावण्याचे आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही.

शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज ईडी कोठडीत आणखी वाढ केली आहे. या प्रकरणात आणखी कागदपत्र ईडीला मिळाल्यामुळे त्यांची कोठडी आणखी वाढवण्यात आली आहे. संजय राऊत यांची ८ ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ईडीने १० ऑगस्टपर्यंत कोठडी मागितली होती. तसेच संजय राऊत यांच्यावर धमकावल्याचे आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर देखील कोर्टात हजर होत्या. मात्र न्यायालयाने स्वप्ना पाटकर यांना आज दिलासा दिला नाही. संजय राऊत अटकेत असले तरी ते मला धमकावत आहेत, असा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला होता. त्यावर कोर्टाने सांगितले की, तुम्ही तुमचे म्हणणे ईडी समोर मांडा.

तसेच या प्रकरणी संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी माध्यमांना सांगितले की, संजय राऊत यांनी धमकावलेला फोन स्वप्ना पाटकर यांनी अजून जमा केलेला नाही. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. कुठलाही घोटाळ झालेला नाही. राज्यसभेच्या प्रतिज्ञा पत्रात ही रक्कम नमूद केली आहे. केवळ संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंपासून दूर करण्यासाठी भाजपची ही चाल आहे. ईडीकडून १० तारखेपर्यंत कस्टडीची मागणी केली आहे. कारण अनोळखी व्यक्तीकडून वर्षा राऊत यांना पैसे येत होते. त्याची देखील चौकशी होणार आहे. दर महिन्या प्रविण राऊतांकडून संजय राऊत यांना ठराविक रक्कम येत होती. वर्षा राऊत यांना पैसे पाठवणारा अनोळखी व्यक्तीचा तपास करायचा आहे. सोमवारपर्यंत इतर लोकांची चौकशी करु असा दावा ईडीने केला आहे.

वर्षा राऊतांची खाती तपास आहोत. यातून अनेक गंभीर गोष्टी पुढे येत आहेत.अलिबाग जमीन खरेदी प्रकरणी आम्ही चौकशी करत आहोत. मात्र सगळया गोष्टी जून्या आहेत असा दावा मनोज मोहिते यांनी कोर्टासमोर केला. जर ईडीला आणखी माहिती मिळाली की, त्यात आणखी वाढ होऊ शकते. या प्रकरणात स्वप्ना पाटकर यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप २९ जुलैला व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लिप राऊत आणि पाटकर यांच्या संभाषणाची आहे. त्यामध्ये संजय राऊत हे पाटकर यांना श‍िवीगाळ करत धमकावत आहेत.

या प्रकरणी स्वना पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात एफआयआर देखील नोंदवला आहे. स्वप्ना पाटकर या पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांच्या विरोधातील साक्षीदार आहेत. पाटकर सांताक्रूझ येथे राहतात. त्या मानसोपचार तज्ञ आहेत. स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची ओळख २००७ मध्ये एका कार्यक्रमात झाली होती. स्वप्ना पाटकर यांनी व्यवसाय‍िक भागिदार व्हावे, अशी संजय राऊत यांची इच्छा होती. मात्र नकार दिल्यामुळे ते नाराज झाले. त्यानंतर २० नोव्हेंबर २०१६ मध्ये त्या राऊतांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी ते जोरजोरात ओरडू लागले. पोलीस कारवाईची धमकी देऊ लागले असे पाटकर यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी केल्या ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Shivsena : सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंची तिहेरी कोंडी, उद्धव ठाकरेंसाठी मात्र आशेचा किरण

Phulandevi : चंबळच्या खोऱ्यातील फुलनदेवी “खासदार” कशी बनली ?

मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने रविवारी संजय राऊत यांना अटक केली होती.आज कोर्टात स्वप्ना पाटकर यांच्या वकीलाने युक्तीवाद केला. संजय राऊत माझ्या क्लाईन्टला धमकावत आहेत. यावर कोर्टाने म्हटले की, संजय राऊत अटकेत असतांना कसे धमकावतील. मात्र संजय राऊत हे राजकीय व्यक्ती असल्यामुळे ते इतरांकडून धमकावण्याचे काम करत असल्याचा युक्तीवाद स्वप्ना पाटकर यांच्या वकीलाने केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी