29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयविधिमंडळ हक्कभंग नोटीशीला संजय राऊत यांचे उत्तर; माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच...

विधिमंडळ हक्कभंग नोटीशीला संजय राऊत यांचे उत्तर; माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर विधिमंडळ हक्कभंगाच्या हक्कभंग प्रकरणी नोटीस पाठविण्यात आली होती. त्या नोटीशीला संजय राऊत यांनी उत्तर पाठविले असून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे त्यांनी उत्तरा दाखल लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणाबाबत खुलासा करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी देखील केली आहे. (Sanjay Raut’s Reply to Legislature Violation Notice)

कोल्हापूर दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विधिमंडळ चोर मंडळ असल्याची टीका करत शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर विधिमंडळात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आमदारांनी संजय राऊत यांच्यावर शरसंधान साधत त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील संजय राऊत यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्यावर कारवाईसाठी विधिमंडळ हक्कभंग समिती स्थापन केली होती. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Sanjay Raut's Reply to Legislature Violation Notice
संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,  कोल्हापूरातील एका कार्यक्रमात विधान मंडळाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतला व विशेषाधिकार आणि हक्कभंगाबाबत सुचना मांडली. याबाबत खुलासा करण्यासाठी आपण मला ३ मार्च २०२३ पर्यंत सायंकाळी ६.३० पर्यंत मुदत दिली.
१) मी आपणास नम्रपणे नमूद करू इच्छितो की, मी दि. ४ मार्चपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौन्यावर होतो व कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत खुलासा करणे शक्य झाले नाही. तरी कृपया सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी. २) महाराष्ट्र विधानमंडळाचा व सदस्यांचा मी नेहमीच आदर करतो. प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. मी स्वतः अनेक वर्षे राज्यसभेचा सदस्य असल्याने मला अशा संसदीय मंडळांचे महत्त्व माहीत आहे. मी संपूर्ण विधान मंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे. हे कृपया लक्षात घ्यावे. तरीही या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी, असे संजय राऊत यांनी खुलासा करताना पत्रात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

धक्कादायक : ठाण्यात भाजपचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

देवस्थानच्या जमिनी हडप करण्यात आल्याचा जयंत पाटील यांचा आरोप

मंत्रिमंडळात एकही महिला नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव; अजित पवारांची खंत

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाज माध्यमात एक मोठी पोस्ट लिहून संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत पाठराखण करताना विधिमंडळाने गठीत केलेल्या समितीमध्ये ठाकरे गटाचा एकही सदस्य नसल्याचे अधोरेखील केले होते. संजय राऊत यांनी केलेले हे विशिष्ठ गटाविषयी केलेली प्रतिक्रीया आहे. संजय राऊत यांनी जे विधान केले त्या विधानाचा विग्रह न करता ते एकत्रितरित्या वाचले असता विधानाचा अन्वयार्थ स्पष्ट होतो. संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांच्यावरील प्रस्तावित कारवाईपूर्वी संसदेतील सदस्यावर अशी कारवाई करण्याबाबतची विधिग्राह्यता तसेच मार्गदर्शक सूचना या बाबी बारकारईने तपासून घ्यावयास हव्या असे देखील पवार यांनी म्हटले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी