27 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरराजकीयज्याच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, त्याच्यावर कारवाई झाली त्यामुळे आनंद आहे - संजय...

ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, त्याच्यावर कारवाई झाली त्यामुळे आनंद आहे – संजय शिरसाठ

टीम लय भारी 

औरंगाबाद : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी आज (दि. 31 जुलै) सकाळी ईडीचे पथक पोहोचल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही समन्सवेळी संजय राऊत गैरहजर राहिल्यामुळे चौकशीसाठी ईडीने थेट राऊत यांचा मैत्री बंगलाच गाठला आहे. संजय राऊतांवरील या ईडी कारवाईवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिंदे गटातून सुद्धा संजय शिरसाठ यांनी सुद्धा “ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, त्याच्यावर कारवाई झाली त्यामुळे आनंद आहे” असे म्हणून माध्यमांशी बोलताना आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान या ईडी कारवाईमुळे शिवसैनिक मात्र संतप्त झाल्याचे दिसून येत आहे.

संजय राऊत यांच्या ईडी कारवाईविषयी बोलण्यासाठी शिंदे गटातील नेते संजय शिरसाठ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिरसाठ म्हणाले, संजय राऊत हुशार नेते आहेत. त्यांना ईडी वगैरे कशाची भीती वाटत नाही. त्यांना आत्मविश्वास आहे की आम्ही जे करतो ते खरं आहे. जेव्हा एवढी मोठी धाड पडते, तेव्हा अटकेची शक्यता जास्त आहे. शिवसैनिक आज आनंदी झाला. ज्याच्यामुळे, ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, त्याच्यावर कारवाई झाली त्यामुळे आनंद आहे, असे म्हणून संजय शिरसाठ यांनी शिंदे गटात ही आनंद वार्ता असल्याचे म्हटले आहे.

हा काही लोकनेता नाही, तो प्रवक्ता होता. त्यामुळे त्याच्याविरोधात काही उठाव वगैरे होणार नाही. सूड कसला, जो जैसा करेगा वैसा भरेगा! असे म्हणून संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली. दरम्यान या कारवाईच्या वेळी संजय राऊत यांच्याकडून काही सूचक ट्विट करण्यात आले यामध्ये बाळासाहेबांची शपथ घेऊन मी सांगतो की, मी कोणताही घोटाळा केलेला नाही. काहीही झालं तरी मी शिवसेना सोडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. या ट्वीटचा संदर्भ घेऊन शिरसाठ म्हणाले बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) शपथ घेऊ नको. तेवढा मोठा तो नाही. तो अधिकार फक्त आम्हाला आहे असे म्हणून राऊतांना त्यांनी यावेळी फटकारले.

संजय शिरसाठ पुढे म्हणाले, आम्ही शिवसेनेसाठी 40 वर्षे राबलो आहे. नोकरी करता करता नेता होणं सोपं आहे. शिवसेना सोडू नको, एक दिवस उद्धव साहेब स्वतः त्याला हाकलतील. आम्ही पाहिलंय याच माणसाने शरद पवारांच्या नादी लागून शिवसेनेचं वाटोळं केलं आहे. आम्ही राष्ट्रवादीबरोबर जाऊ नका सांगत असताना या माणसाने तिकडे जाणेच कसं बरोबर आहे हे सांगितलं. आता ईडीची चौकशी सुरू आहे, यावेळी त्याच्या अटकेची शक्यता नाकारता येणार नाही असे म्हणून शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

हे सुद्धा वाचा…

संजय राऊतांच्या ईडी कारवाईवर भाजप नेत्यांकडून यच्छेद तोंडसुख

‘मरेन पण शरण जाणार नाही’, ईडीच्या धाडीनंतर संजय राऊतांचा बाणा कायम

राज्यपालांना दिल्लीला पाठविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!