33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयसत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज; देवेंद्र फडणवीसांच्या मैत्रीचा परिणाम?

सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज; देवेंद्र फडणवीसांच्या मैत्रीचा परिणाम?

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) नाशिक शिक्षक मतदार संघातून सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अतिशय नाट्यमयरित्या सुधीर तांबे यांनी माघार घेतली. तर त्यांचे सुपुत्र युवा नेते सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष उमेद्वारी अर्ज दाखल केला. सत्यजित तांबे यांना भाजपकडून (BJP) उमेद्वारी मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सत्यजित तांबे यांचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळेच सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्याच्या चर्चेला देखील उधाण आले आहे. (Satyajit Tambe application Vidhan Parishad Election Independent candidature)

विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांची जोरदार तयारी भाजपकडून सुरू आहे. त्यातच नाशिक शिक्षक मतदार संघासाठी सत्यजित तांबे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या. राजकीय पटावर कधी काय होईल यांची कोणतीही शक्यता वर्तवता येत नाही. आज देखील त्याचा प्रत्यय आला. काँग्रेसने सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेद्वारी जाहीर केली होती. आज ते आपला उमेदवारी अर्ज देखील भरणार होते. अखेरच्या क्षणी त्यांनी आपल्या मुलासाठी माघार घेतल्याचे दिसून आले.

आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने तांत्रिक अडचणीमुळे मला अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा लागला. मात्र मी काँग्रेसचाच उमेदवार आहे. असे सत्यजित तांबे म्हणाले. वडिलांनी १४ वर्षे शिक्षकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

विलासरावांचे सुपुत्र अमित देशमुख भाजपच्या वाटेवर? लातूरच्या राजकारणातील सस्पेंस वाढला!

जगातील कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात भारी आहे, माहितीये का?

दुखापतग्रस्त असलेल्या बाळासाहेब थोरातांनी अपघातग्रस्त धनंजय मुंडेंची घेतली भेट

देवेंद्र फडणवीस यांचे माझ्यावर प्रेम

सत्यजित तांबे म्हणाले, भाजपच्या उमेद्वारीबाबत माझी त्यांच्याशी चर्चा झाली नव्हती मात्र देवेंद्र फडणवीस यांचे माझ्यावर प्रेम आहे, नव्या नेतृत्तवाला, युवकांना ते संधी देतात त्यामुळे फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठिबा देण्याबाबत मागणी करणार असल्याचे देखील ते म्हणाले.

सत्यजित तांबे आमदारकीसाठी अनेकवर्षांपासून इच्छुक आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचा भव्य कार्यक्रम झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाची देखील जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान नाशिक शिक्षक मतदार संघातून सत्यजित तांबे यांना भाजप उमेद्वारी देणार असल्याची चर्चा देखील सुरू होती. त्यातच आता सुधीर तांबे यांची नाट्यमय रित्या निवडणुकीतून माघार आणि सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेद्वारी अर्ज दाखल झाल्याने, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी