27 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरराजकीयअमित शहांच्या घरी खासदारांची गुप्त बैठक

अमित शहांच्या घरी खासदारांची गुप्त बैठक

टीम लय भारी

मुंबई: राज्यात झालेल्या सत्तानाटयामध्ये अमित शहांचा हात होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मान्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशिर्वादाने शिवसेनेचे आमदार फोडण्यात भाजप यशस्वी झाला. आता खासदारांना फोडण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी अमित शहांच्या घरी शुक्रवारी 11 खासदारांना बोलवून तब्बल पाच तास बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  फडणवीस उपस्थित होते. तर दुसरीकडे मातोश्रीवर आज राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात उध्दव ठाकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीत बहुसंख्य आमदारांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा आहे. मात्र आपण महाविकास आघाडी सोबत असल्याने यशवंत सिन्हांना मतदान केले पाहिजे अशीही एक चर्चा झाल्याचे संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले, असे असले तरी उध्दव ठाकरे यांनी या बाबतची आपली भूमीका अजून स्पष्ट केली नाही. ते दोन दिवसांनी आपला निर्णय सांगणार आहेत. त्यांचा निर्णय हा खासदारांना मान्य करावा लागेल असेही संजय राऊत यांनी सांगितले.

आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत सर्वच खासदारांचा सूर एकनाथ शिंदे आणि भाजपबरोबर जुळवून घ्यायला हवे असा होता. मात्र उध्दव ठाकरेंनी आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे. कुठलाही निर्णय जाहीर केला नाही. मागच्या आठवडयात शुक्रवारी आमित शहा एकनाथ शिंदे यांची भेट झाली त्याच वेळी शिवसेनेच्या खासदारांची भेट झाली. या खासदारांनी आपली नावे गुप्त ठेवली आहेत. त्यामुळे आता आमदारांनंतर खासदारही भाजपवासी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत यात शंका नाही

हे सुध्दा वाचा:

नाशिकची पाणी कपात टळली

महाराष्ट्रातला ‘पेचप्रसंग’ कधी संपणार ?

गोगलगायीच्या त्रासाने धनंजय मुंडे वैतागले!

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!