‘ईडी’, ‘सीबीआय’कडून चौकश्या आणि अटकेचे भय होते म्हणूनच आपण कसे पळून गेलो, त्या पलायनाची सुरस कथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली पाहिजे. दिल्लीने महाराष्ट्रद्रोही सरकार जनतेच्या छाताडावर बसवले आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी प्रतारणा करणारे सरकार दिल्लीने आमच्यावर लादले आहे. वकिलीची डिग्री असलेले फडणवीस महाराष्ट्रद्रोह्यांची वकिली करण्यातच धन्यता मानीत आहेत. बेकायदा सरकारच्या चहापानास जाणे हाच महाराष्ट्रद्रोह आहे. विरोधकांना देशद्रोही ठरविणे ही भाजपची परंपरा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय विरोधक देशद्रोही आहेत, असे ‘मोदी’छाप विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे गटाच्या ‘सामना’ या मुखपत्रात शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल करण्यात आला आहे. (separatist MLAs including Chief Minister Eknath Shinde will be disqualified)
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ‘राष्ट्रद्रोही’ आणि ‘महाराष्ट्रद्रोही’ असे दोन गट पडलेले जनतेला पाहायला मिळाले. जनतेच्या हिताच्या मुद्द्यांपेक्षा भावनिक मुद्द्यांवरच शिंदे-फडणवीस सरकार आणि उद्धव ठाकरे गटामध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे. यामुळे लोकांचे प्रबोधन किती होते हा संशोधनाचा विषय असला तरी मनोरंजन मात्र नक्कीच होत आहे, अशा प्रतिक्रिया बुद्धिजीवी वर्गातून व्यक्त होत आहेत. चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्रद्रोह झाला असता, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केली होती. या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना बरं झालं राष्ट्रद्रोह्यांसोबत चहा पिण्याची वेळ टळली असा खोचक टोला लगावला होता. आता ‘राष्ट्रद्रोही’ आणि ‘महाराष्ट्रद्रोही’ या मुद्द्यावर दोन्ही पक्षांत सामना रंगला आहे.
‘सामना’मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या विधानांचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्रातील सरकार घटनाबाह्य पद्धतीने बनविण्यात आले आहे. सरकारमधील ४० आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे. सर्वोच्च न्यायालयात ज्या पद्धतीने सुनावणी सुरू आहे ते पाहता स्वतः भाजपचे मिंधे असलेले मुख्यमंत्री व त्याचे फुटीर आमदार अपात्र ठरू शकतात, असा दावा ‘सामना’मध्ये करण्यात आला आहे. अटकेच्या सुपाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा घेत आहेत व देशभरातील विरोधकांना अटक केली हात आहे. त्या यंत्रणांचे मालक दिल्लीत बसलेले असताना फडणवीस आणि महाजन यांना कोण हात लावणार? तत्कालीन महाविकास आघाडी सरकाने ‘विक्रांत’ घोटाळयापासून अनेक भ्रष्ट प्रकरणांच्या चौकश्या लावताच यांच्या पाटलोणी भिजून गेल्या व सत्तांतर होताच या साऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना ‘क्लीन चिट’ देऊन फडणवीस-शिंदे सरकारने मोठी देशसेवाच केली आहे. असा टोला उद्धव ठाकरे गटाने किरीट सोमय्या यांना लगावला आहे.
विरोधकांचे फोन चोरून ऐकण्यासाठी वरिष्ठ ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांना बेकायदेशीर मुभा देणे हा राष्ट्रद्रोहाच आहे व त्या राष्ट्रद्रोह्यांना ‘क्लीन चिट’ देणे हा त्यापेक्षा मोठा गुन्हा ठरतो, अशी टीका ‘सामना’मध्ये करण्यात आली आहे. ‘फोन टॅपिंग’ प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर दोषारोप करण्यात आले होते. यासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी बेकायदेशीररित्या त्यांना मुभा दिल्याचे ठाकरे गटाने म्हंटले आहे.
हे सुद्धा वाचा
बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा भोवला; कोर्टाने ठोठावली शिक्षा
बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा भोवला; कोर्टाने ठोठावली शिक्षा