राज्यात शिवसेनेच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन गट झाले. अजित पवारांनी (Ajit Pawar) 8 आमदारांसह भाजपशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन करून उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार झाले. यावर काही महिन्यांपासून चिन्हं आणि पक्षावर अजित पवार गटाने दावा सांगितला होता. हेच एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटानं देखील केलं होतं. निवडणूक आयोगाने चिन्हं आणि पक्ष हा एकनाथ शिंदेंचा असल्याचे सांगितले. आता हीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार गटात पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘तारीख पे तारीख’ करत सुनावणी पुढे ढकलली. मात्र (20 नोव्हेंबर) दिवशी दिल्ली येथे सायंकाळी 4 वाजता सुनावणी होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) उपस्थित राहणार आहेत.
आतापर्यंत झालेल्या सुनावणीला अजित पवार गटाने शरद पवार गटावर अनेक आरोप आणि दावे केले होते. शरद पवार हे आपल्या मर्जीने पक्षाचा कारभार करतात. इतर कोणाचेही ऐकत नसल्याचे दावे अजित पवार गटाने सुनावणी वेळी केले होते. मात्र आता शरद पवार गटाकडे आपली बाजू मांडण्यासाठी युक्तिवाद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेवटची सुनावणी ही (9 नोव्हेंबर) दिवशी झाली होती. यावेळी शरद पवार गटाने अजित पवार गटावर 420 कलमांतर्गत कारवाईची मागणी केली.
शरद पवार गटाने न्यायालयात अजित पवार गटावर दावा करत सांगितले की, अजित पवार गटाने मृत व्यक्ती, डिलिव्हरी बॉय, झोमॅटो अशी प्रतिज्ञापत्रक नायायलायाकडे सादर केली.
हे ही वाचा
आधी मध्य प्रदेश आणि आता तेलंगणा; निवडणुकीच्या तोंडावर राम मंदीराची ऑफर सुरूच
नामदेवराव जाधवांच्या तोंडाला फासलं काळं; पवार कार्यकर्ते आक्रमक
अमित शहानंतर उदय सामंतांची अयोध्यावारी ऑफर
आजचा दिवस महत्त्वाचा
अनेक दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार गटात सुनावणी सुरू आहे. एका बाजूला अजित पवार गटाचा युक्तिवाद हा शरद पवार गटावर करण्यात आला. आता शरद पवार गट अजित पवार गटावर सलग तीन दिवस युक्तिवाद करणार असल्याची माहिती समोर आली. शिवसेनाप्रमाणे अजित पवार गटाने केलेलं षडयंत्र असल्याचं बोललं जातंय. यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे शरद पवार गटाकडे राहणार की अजित पवार गटाकडे जाणार? यावर मोठे प्रश्नचिन्ह असून सुनावणीच्या तीन दिवसात स्पष्ट होणार आहे.