29 C
Mumbai
Sunday, September 17, 2023
घरराजकीयशरद पवारांना मोठा धक्का; नागालँडमधील राष्ट्रवादीचे सातही आमदार, प्रदेश कार्यकारिणी अजित पवारांच्या...

शरद पवारांना मोठा धक्का; नागालँडमधील राष्ट्रवादीचे सातही आमदार, प्रदेश कार्यकारिणी अजित पवारांच्या गळाला

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडली आहे. राज्यातील अनेक आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असून अजित पवारांनी पक्ष आणि पक्ष चिन्हावर देखील दावा केला आहे. अशातच आता शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का अजित पवारांनी दिला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादीचे सातही आमदार तसेच संपूर्ण प्रदेश कार्यकारिणीने अजित पवारांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे शरद पवारांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत.

अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारला पाठींबा जाहीर करत आठ मंत्र्यांसह सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी पक्ष आणि पक्षचिन्हावर देखील दावा केला आहे. तसेच शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन हटवित असल्याचे पत्र देखील त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केले आहे.
पक्षात फुट पडल्यानंतर दोन्ही गटांचे मुंबईत मेळावे पार पडले. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती.

Sharad Pawar blow, Nagalad NCP MLA, supports To Ajit Pawar

दरम्यान विधिमंडळ अधिवेशनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीचे मंत्र्यांसोबत आणि आमदारांसोबत सोबत अशा दोन वेळा शरद पवारांची भेट घेत आशीर्वाद मागितला. तसेच यातून मार्ग काढावा असे देखील ते म्हणाले होते. मात्र यावर पवारांनी कोणतीच प्रतिक्रीया दिली नव्हती. त्यानंतर एनडीएच्या बैठकीला देखील अजित पवार दिल्लीला उपस्थित राहिले. यावेळी मोदी, शहा यांच्यासोबत खलबते झाली. अजित पवार यांचे बंड मोडून काढण्यात पवारांना 2019 साली यश आले होते. मात्र आताचे बंड शरद पवारांसाठी कसोटीचा काळ ठरले आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजन करणारा शहाणा कोण ? जंयत पाटलांचा खडा सवाल

बाळासाहेब थोरातांनी दोनच दिवसात पावसाळी अधिवेशन गाजवले

मणिपूर महिला अत्याचाराच्या घटनेने देशात संतापाची लाट

एकीकडे शरद पवार इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीत सहभागी आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनी एनडीएच्या आघाडीसोबत आहेत. रविवारी दोन्ही आघाड्यांच्या बैठका पार पडल्या इंडियाची बैठक बंगळूरुमध्ये पार पडली याच बैठकीत युपीएचे नाव बदलून इंडिया करण्यात आले. तर दुसरीकडे दिल्लीत एनडीएची बैठक पार पडली या बैठकीला अजित पवार आणि प्रफुल पटेल उपस्थित होते. एनडीएची बैठक पार पडल्यानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत अजित पवार आणि प्रफुल पटेल यांची खलबते झाली.

त्यानंतर आज मोठी घडामोड घडून आली आहे. नागालॅडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आले आहेत. हे सातही आमदार तेथील भाजप सरकारसोबत आहेत. या आमदारांनी आणि नागालॅँड राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचे प्रसिद्धीपत्रक राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय प्रवक्ता ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी काढले आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी