34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeराजकीयModi government : मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी शरद पवार, नितीश कुमार नवीन...

Modi government : मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी शरद पवार, नितीश कुमार नवीन व्युहरचना आखणार

ब‍िहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे येत्या 8 सप्टेंबरला दिल्ली येथे शरद पवार यांना भेटणार आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच नितीश कुमार हे शरद पवार यांना भेटणार आहेत.

मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी‍ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांसाठी नवीन व्युहरचना आखण्याची तयारी सुरु झाली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला कसे सामोरे जायचे याची तयारी आत्ता पासूनच सुरु करण्यात आली आहे. कारण भाजपने ‘मिशन लोटस’ हा कार्यक्रम राबवून इतर सर्व पक्षांचा बिमोड करण्याचे ठरवले आहे. याच पार्श्वभूमीवर ब‍िहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे येत्या 8 सप्टेंबरला दिल्ली येथे शरद पवार यांना भेटणार आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच नितीश कुमार हे शरद पवार यांना भेटणार आहेत.

Modi government : मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी शरद पवार, नितीश कुमार नवीन व्युहरचना आखणार

शरद पवार हे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे राजकरणाचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्याकडे राजकारणातले भिष्माचार्य म्हणून पाहिले जात आहे. तर नितीश कुमार हे देखील बिहारचे मोठे नेते आहेत. त्यांना देखील राजकारणातला दांडगा अनुभव आहे. असे मोठे नेते एकत्र आले तरच यातून काही तरी मार्ग निघू शकतो. कारण भाजप हा देशात प्रबळ पक्ष बनत चालला आहे. त्यांना देशात एक हाती सत्ता आणायची आहे.

विरोधकांना कायमचे संपवायचे आहे. त्यांना विरोधी पक्ष नकोच आहे. आशा प्रकारची स्थ‍िती लोकशाहीला मारक आहे.या भेटीमध्ये देशाच्या राजकीय‍ परिस्थ‍ितीवर चर्चा होणार आहे. मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी या भेटीमध्ये विचारविमर्श होणार आहे. देशात नवा पर्याया निर्माण करण्यावर या भेटत चर्चा होणार आहे. त्यामुळे शरद पवार नितीश कुमार यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

Cocaine : बापरे ! त्याने तब्बल 87 कोकेनच्या गोळया पोटात लपवल्या, कस्टमने घेतली झडती

BMC : मनपाच्या मुख्य लिपीक परिक्षेमध्ये मोठा घोटाळा, नापास उमेदवारांना केले पास

BJP : ‘कमळाबाईमध्ये आई, ताई व कडक लक्ष्मी सुद्धा आहे’

शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरुन गणपतीमध्ये वादंग माजला आहे. शिवसेना आणि शिंदेगट आमनेसामने उभे ठाकले आहेत. शिवाजी पार्क मैदान आपल्याला मिळावे म्हणून दोन्ही कडून प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनेला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची परवानगी मिळालेली नाही. या वादामध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना सांगितले की, मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे.

Modi government : मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी शरद पवार, नितीश कुमार नवीन व्युहरचना आखणार

पण वाद टाळले गेले पाहिजेत. मुख्यमंत्री हे राज्याचे असतात. एका ठराव‍िक पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक भूम‍िका घ्यायला हवी. सामोपचाराने हा वाद सोडवायला हवा. शरद पवारांचा हा सल्ला एकनाथ शिंदे किती मानतात हे येणारा काळच ठरवेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी