31 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeराजकीयशरद पवारांच्या दबावात उद्धव ठाकरेंनी अहमदनगरचे नामांतर केले नाही; गोपीचंद पडळकर यांचा...

शरद पवारांच्या दबावात उद्धव ठाकरेंनी अहमदनगरचे नामांतर केले नाही; गोपीचंद पडळकर यांचा घणाघात

शिंदे फडणवीस सरकारने काल चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात अहमदनगचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्याची घोषणा केली. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या दबावात येऊन अहमदनगरचे नामांतर केले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, अहिल्यादेवींचे जन्मगाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर असे करावे, अशी लोकांची जनभावना होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना वारंवार तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली, सभागृहात मागणी केली. परंतू शरद पवारांच्या दबावाखाली उद्धव ठाकरेंनी नामांतराचा निर्णय केला नाही.

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, आता आमचे सरकार आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप-शिवसेनेचे सरकार आले आणि 11 महिन्याच्या आत सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याचे घोषीत केले. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो.

हे सुद्धा वाचा
मान्सूनपूर्व पाऊस राज्याला तडाखा देणार !

राज ठाकरेंचे मोदींना पत्र – ‘देश की बेटियाँ’ना न्याय द्या !

कोकणातून मासे गायब होणार; एकीकडे रिफायनरीचे सावट, दुसरीकडे LED फिशिंगमुळे कोकणातील मासेमारी धोक्यात!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशामध्ये पहिल्यांदा रामराज्य यावे यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. जेव्हा जेव्हा मुस्लीम आक्रमकांनी हिंदू मंदिरांची तोडफोड केली. तेव्हा त्या सर्व मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याचे काम हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतभर केले. असे गोपीचंद पडळकर म्हणाले. महाराष्ट्रातील सर्व जनतेला, तसेच अहिल्याभक्तांना आवाहन करतो की, आपण अहिल्यादेवींची जयंती एक महिनाभर साजरी करावी, जेणेकरुन महाराष्ट्रात उर्जावान वातावरण तयार होईल, असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी