29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeराजकीयSharad Pawar: 'राज्यपालांनी सर्व मर्यादा ओलांडल्या'

Sharad Pawar: ‘राज्यपालांनी सर्व मर्यादा ओलांडल्या’

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाढतोय वाद

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस वक्तव्यावरून वाद वाढत आहे. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टीकास्त्र सोडले आहे. गुरुवार(24 नाव्हेंबर) रोजी मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, राज्यपालांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी आता या प्रकरणात हस्तक्षेप करावा. बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्यांना मोठी पदे देणे योग्य नाही, असे ही ते या वेळी म्हणाले.

भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. ते म्हणाले, राज्यपालांना आता दिल्लीत बोलावण्यात आले आहे. मला वाटते की त्यांना पदावरुण हटवण्यात येईल आणि हटवल सुद्धा पाहिजे. त्यांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये राग निर्माण होत आहे.

शिवाजी महाराज्यांवर काय म्हटले कोश्यारी?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करताना औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात राज्यपालांनी आपल्या भाषणात वादग्रस्त वक्तव्य केले होते. कार्यक्रमात कोश्यारी बोलत होते. कोश्यारीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आम्ही मिडल आणि हायस्कूलमध्ये शिकायचो तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारयचे आमचा आवडता नायक कोण आहे तर आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस म्हणायचो, कोणाला नेहरूजी आवडायचे, कोणाला गांधीजी आवडायचे तर मला असे वाटते की कोणी तुम्हाला विचारले की तुमचा आयकॉन कोण आहे, तुमचा आवडता हिरो कोण आहे, तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही, इथे महाराष्ट्रातच तुम्हाला ते सापडतील. शिवाजी हा जुन्या काळातील गोष्ट आहे, मी नव्या युगाबद्दल बोलतोय, कुठेतरी सापडेल. डॉ. आंबेडकरांपासून डॉ. गडकरींपर्यंत, नितीन गडकरीसाहेब तर इथेच सापडतील.

शरद पवारांनी राज्यपालांना त्याच कार्यक्रमात का थांबवले नाही?
शरद पवार यांनी सांगितले की, सगळा कार्यक्रम संपला होता आणि त्यानंतर राज्यपाल  बोलायला उभे राहिले. त्याशिवाय राज्यपाल  कोश्यारीचं असं भाषण कानावर पडेल असं मला वाटलचं नव्हतं.

हे सुद्धा वाचा

Mantralaya : चौकशीच्या फेऱ्यातून निसटण्यासाठी मंत्र्यांच्या खासगी सचिवाचा आटापीटा; मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये उताविळपणाची जोरदार चर्चा

Uddhav Thackeray : राज्यपालांना हटवा; उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र बंदचा इशारा

Anil Gote : देवेंद्र फडणविसांना पाहून सरड्यानेही रंग बदलणे दिले सोडून’

उद्धव ठाकरेंच्या गटा कडून निषेध 

राज्यपाल कोश्यारींचा वाद समोर आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटही निषेध करत आहे. संजय राऊत यांच्यासह सर्व नेत्यांनी विरोध केला असून कोश्यारी यांना हटवण्याची मागणी केली आहे. कोश्यारी गुरुवारपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण आणखीच तापला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी