28 C
Mumbai
Sunday, March 24, 2024
Homeराजकीयशरद पवार म्हणाले, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, आर....

शरद पवार म्हणाले, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, आर. आर. पाटीलांनी कर्तृत्व सिद्ध केले

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर ते मोठ्या जोमाने राजकीय घडामोडींमध्ये सक्रीय झाले आहेत. सोलापूर दौऱ्यानंतर काल त्यांनी निपाणीत पक्षाचा प्रचार केला, त्यानंतर आज ते साताऱ्यात होते. सातारा दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ‘सामना’तून त्यांच्याबद्द्ल लिहिलेल्या अग्रलेखाबद्दल मत व्यक्त केले. ते म्हणाले त्यांचा लिहिण्याचा अधिकार आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. आम्ही काय करतो आम्हाला ठाऊक आहे व त्यात आम्हाला समाधान आहे, यावेळी पक्षाची भूमिका मांडताना त्यांनी पक्षातील नेत्यांनी कशापद्धतीने कर्तृत्व सिद्ध केले याचा दाखला देखील दिला.

शरद पवार यांना पक्षाचा वारस तयार करण्यात अपयश आल्याची टीका सामनातून करण्यात आली होती. त्यावर आज शरद पवार यांनी खास शैलीत उत्तर दिले. पक्षाच्या नेतृत्वाची फळी कशी तयार केली जाणार याची खात्री पक्षातील सर्व सहकाऱ्यांना आहे. पक्षाच्या नेतृत्व घडविण्याच्या मुद्दयावर 1999 सालचा मंत्रिमंडळ स्थापनेचा एक किस्सा यावेळी सांगितला. ते म्हणाले, त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीचे संयुक्त मंत्रिमंडळ स्थापन करायचे होते. त्या मंत्रिमंडळात जयंतराव पाटील, अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, आर. आर. पाटील अशी अनेक नावं होती ज्यांची ती पहिली टर्म होती. त्यांची नियुक्ती केली. मी जेव्हा मंत्रिमंडळात गेलो तेव्हा मला पहिले राज्यमंत्री पद मिळाले. काही वर्षे राज्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर मला प्रमोशन मिळाले. पण आता मी जी नावं घेतली त्या सर्वांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि महाराष्ट्राने बघितले की त्या प्रत्येकाने आपले कर्तृत्व सिद्ध केले.

हे सुद्धा वाचा

‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्याला भरचौकात फासावर…; जितेंद्र आव्हाड कडाडले

मराठमोळ्या वाडा संस्कृतीची साक्ष देणारे शिवाजीनगर मेट्रो स्थानक

माता न तू वैरिणी: प्रियकराच्या मदतीने निर्दयी मातेने घेतला लेकराचा जीव

याबद्दल कोणी काय लिहिले याचे महत्त्व आमच्या दृष्टीने नाही. त्यांचा लिहिण्याचा अधिकार आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो, असे सांगतानाच शरद पवार म्हणाले, आम्ही काय करतो आम्हाला ठाऊक आहे व त्यात आम्हाला समाधान आहे. राष्ट्रीय पक्षांच्या धोरणामध्ये प्रत्येकाची भूमिका सहकारी पक्षाबरोबर १०० टक्के जुळेल असं कधी होत नाही. काही गोष्टी पुढे-मागे असतात, काही मतं वेगळी असतात. त्याबद्दल आमच्यात गैरसमज नाही. त्यामुळे महाविकास आघाडीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी