30 C
Mumbai
Tuesday, August 29, 2023
घरराजकीयछगन भुजबळ हे तेलगी घोटाळ्यात तुरूंगात जाणार होते, पण शरद पवार यांनी...

छगन भुजबळ हे तेलगी घोटाळ्यात तुरूंगात जाणार होते, पण शरद पवार यांनी वाचविले !

छगन भुजबळ म्हटले की ओबीसींचा नेता अशी त्यांची प्रतिमा सामान्य लोकांच्या मनात उभी राहते. पण त्यांची दुसरी एक प्रतिमा आहे. मंत्री म्हणून त्यांनी भ्रष्टाचाराचे अनेक कल्पक उपक्रम जन्माला घातले. शरद पवारांच्या वरदहस्तामुळे त्यांना उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अशी अनेक खाती मिळाली. उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहखाते होते. त्यावेळी त्यांनी तेलगी घोटाळा जन्माला घातला. मात्र तेलगी घोटाळ्यात त्यांनी स्वतःला नामंनिरोळे ठेवले व अनेक पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या माथी खापर फोडले. तेलगी प्रकरणात छगन भुजबळ हे सुद्धा अडकणार होते. पण शरद पवार यांनीच त्यांना वाचविले.

कोणतेही खाते द्या, तिथे भ्रष्टाचार करून दाखवणारच अशी छगन भुजबळ यांची सरकारमध्ये प्रतिमा आहे. गृहमंत्री असताना त्यांची तेलगीसोबत सलगी होती. तेलगी हा मोठा इंधनमाफीया होता. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचे तेलगीसोबत चांगले मेथकूट जमले होते. पण पुढे त्यांचे फाटले. गृहमंत्री असल्यामुळे छगन भुजबळ यांनी त्यावेळी तेलगीच्या गळ्यात बोगस मुद्रांक छपाईचा घोटाळा अडकवला. या घोटाळ्यात भुजबळ यांनी काही लोकप्रतिनिधी व पोलीस अधिकाऱ्यांनाही अडकवून टाकले.

या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात आली. सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात छगन भुजबळ यांचे सुद्धा नाव होते. शरद पवार त्यावेळी केंद्रात मंत्री होते. पवार यांनी भुजबळ यांना वाचविण्यासाठी स्वतःची ताकद खर्ची घातली.
सीबीआयच्या आरोपपत्रातून शरद पवार यांनी छगन भुजबळांचे नाव हटविले. त्यामुळे छगन भुजबळ वाचले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता एक ट्विट केले आहे. त्यामुळे छगन भुजबळांचे जुने कांड पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.
तेलगी घोटाळ्यात छगन भुजबळ इतके बुडाले होते की, शरद पवार सुद्धा त्यावेळी नाराज झाले होते. त्यांनी नंतरच्या काळात भुजबळ यांच्याकडून उपमुख्यमंत्रीपद व गृहमंत्रीपद काढून घेतले. शरद पवार यांच्यावर दबाव आणण्यासाठी भुजबळ यांनी त्यावेळी मोठी खेळी केली होती.
हे सुद्धा वाचा
आदित्य ठाकरे महापालिकेवर प्रचंड संतापले

मंत्री गिरीष महाजनांच्या बंगल्यावर सामान्य लोकांनाही मिळते पोटभर जेवण !

रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा योग, काही पणवती तर लागणार नाही ना?  

भुजबळ यांनी समता परिषदेची स्थापना केली. त्यावेळी त्यांना पहिल्यांदाच महात्मा फुलेंच्या विचारांची आठवण झाली. समता परिषदेची स्थापना करून त्यांनी देशभर मोठ्या सभा घेवून ओबीसींना एकत्र आणण्याची मोहीम राबविली.
भुजबळ यांना शरद पवार यांनी पुन्हा आधार दिला. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची (पीडब्ल्यूडी) जबाबदारी दिली. त्यावेळी पीडब्ल्यूडी हे दुय्यम दर्जाचे खाते समजले जायचे. त्यामुळे भुजबळ नाराजच होते. पण भुजबळ यांनी या खात्याची जबाबदारी घेवून त्या ठिकाणीही भ्रष्टाचाराचे नवनवे प्रयोग केले. बोगस कामे करून बिले कशी काढायची हे त्यांनी अधिकाऱ्यांना शिकविले. भुजबळांमुळे पीडब्ल्यूडी हे क्रिम खाते म्हणून नावारूपाला आले.

दरम्यान, भुजबळांची अनेक पापे पाठीशी घातल्यानंतरही त्यांनी शरद पवारांच्या विरोधात सापाप्रमाणे फणा काढल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Sharad Pawar, Chhagan Bhujbal, Telagi Scam

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी