28 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरराजकीय'जगाला माहितीये की माझी जात कोणती आहे; मी लपवू शकत नाही'

‘जगाला माहितीये की माझी जात कोणती आहे; मी लपवू शकत नाही’

राज्यात आरक्षणावरून वाद-विवाद सुरू आहेत. यावरून गेली अनेक दिवसांपासून मराठा, धनगर समाज आरक्षणासाठी (Maratha And Dhangar reservation) उपोषण करत असून आंदोलने केली जात आहेत. मात्र सरकार यावर कोणताही मार्ग काढत नाही. या आरक्षणाच्या मद्द्यावरून वेगळ्याच विषयाची चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंत असे कधी खुले आम घडले नव्हते. मात्र या आरक्षणाच्या मद्द्यावरून शरद पवारांचा सोशल मीडियावरील दाखला व्हायरल झाला होता. यावर ओबीसी जात असल्याचे नमूद करण्यात आले होते. असा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात घडत आहे. यावरून आता शरद पवार (Sharad Pawar) गटाने भाजपावर (BJP) सडकून टीका केली असून व्हायरल दाखला खोटा असून खरा दाखला माध्यमांसमोर आणला आहे. (१४ नोव्हेंबर) दिवशी बारामतीत माध्यमांशी बोलत असताना त्यांनी  दाखल्याबाबत खुलासा केला आहे.

माध्यमांशी बोलत असताना शरद पवार म्हणाले की, ‘मी महाराष्ट्र एज्युकेशन येथे शिकत असतानाचा माझा खरा दाखला आहे. काही लोकांनी इंग्रजीत खोटा दाखला बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्या दाखल्यात माझ्या नावासमोर ओबीसी असे नमूद केले आहे, मला ओबीसी समाजाचा आदर आहे. मात्र जन्मात: असलेली जात तर लपवू शकत नाही. यामुळे संपूर्ण जगाला माहित आहे की, माझी जात कोणती आहे,’ असे वक्तव्य शरद पवारांनी केले.

हे ही वाचा

‘मध्य प्रदेशात भाजप सरकार आणा आणि रामाचे दर्शन घ्या’; भाजपकडून ऑफर?

सुप्रिया सुळेंचे आरक्षणासाठी सरकरला गाऱ्हाणे

नवरा-बायकोच्या अतुट नात्याचा सण दिवाळी पाडवा

‘तरूणांचे प्रश्न केंद्रात मांडावे लागतील’

‘मी कोणत्याही जातीवर राजकारण केले नाही. कोणत्याही जातीवर समाजकारण केले नाही आणि इथून पुढे करणारही नाही. मात्र त्या समाजासाठी मला जो हातभार लावता येतील ते मी करेल, त्यानंतर त्यांनी मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करत आरक्षणाचा प्रश्न हा राज्य आणि केंद्र सरकारच्या आखत्यारीतील स्वरूपाचा आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी आंदोलन करणाऱ्या तरूणांशी संवाद साधला आहे. त्या तरूणांनी काही प्रश्न मांडले आहेत, मात्र ते प्रश्न केंद्रात मांडावे लागतील’, असे वक्तव्य शरद पवारांनी केले आहे.

‘मराठा आरक्षणाची भावना तीव्र आहे. याकडे दुर्लक्ष करूण चालणार नाही, याकडे केंद्र आणि राज्य सरकारने कामगीरी करावी. आम्ही फक्त लोकांची भावना तिथपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहोत एवढेच सांगतो’ असे शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल वक्तव्य केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी