29 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमहाराष्ट्र'अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही' शरद पवारांनी केले भाकीत

‘अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही’ शरद पवारांनी केले भाकीत

भाजप पक्ष हा देशातील विविध राज्यात फोडाफोडीचे राजकारण करून आपली सत्ता स्थापन करत आहे. महाराष्ट्रातही भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी ही दोन मित्र पक्ष फोडले आहेत. त्या पक्षांनी भाजपशी युती करून सत्ता स्थापन केली आहे. यात शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वर्षापूर्वी आपले 40 आमदार घेऊन भाजपशी युती केली. आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार झाले. तर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पवारांची साथ सोडून भाजप आणि शिंदे गटासोबत सत्ता स्थापन केली आहे. यावेळी अजित पवार यांना मुख्यमंत्री पद मिळेल चर्चा सुरू होती. आता याबाबत शरद पवारांनी याबाबत भाष्य केले. अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नसल्याचे शरद पवार बोलले आहेत.

अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे याआधी अनेकदा बोलले जात होते.  भाजपशी युती केल्याने आता अजित पवारच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील असे अनेकांना वाटले होते. काही दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे शेतकरी सभेत अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदावरून भाष्य केले होते. सर्व म्हणतात की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. सर्वांनी काम केलं पाहिजे. 45 आमदारांची संख्या ही 90 आमदारांपर्यंत कशी होईल. याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तेव्हाच अजित पवार मुख्यमंत्री होतील.” असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. मात्र आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी आजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे पत्रकार परिषदेत वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळांवर देखील भाष्य केले आहे.

हेही वाचा 

100 कोटी वसुली करणारा गृहमंत्रीच का आवडतो..चित्रा वाघ सुप्रिया सुळेंबद्दल अशा का बोलल्या?

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी होणार

शरद पवारांचा खेळच न्यारा… भुजबळ पवारांबद्दल काय बोलले?

राष्ट्रवादी पक्षात गट पडण्याआधी राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष कोण असेल. यावर बऱ्याचदा बैठकी, चर्चा देखिल झाली.  मात्र या चर्चेत भुजबळ यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे आणले, स्वतः खोटे बोलले त्यांनीच कबूल केले आहे. असे स्वतः शरद पवार बोलले आहेत. त्यानंतर त्यांनी भाजप राज्यातील प्रत्येक पक्ष फोडत आहे. सत्ता हस्तगत करत आहे. याविरोधातही शरद पवारांनी 1977 च्या सालातील उदाहरण दिले आहे. 1977 या सालात देशात पंतप्रधान पदासाठी चेहरा नव्हता. तरीही देशातील जनतेने पंतप्रधान पदाचा चेहरा दिला आहे. यामुळे आता इंडिया आघाडी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करेल का हे फारसे महत्वाचे नाही.

एवढेच नाही तर ते म्हणाले की आम्ही इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना घेण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत असताना आपले मत मांडले आहे.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी