28 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरराजकीयप्रचारासाठी ‘शरद पवार‘ मैदानात उतरणार

प्रचारासाठी ‘शरद पवार‘ मैदानात उतरणार

टीम लय भारी

मुंबईः आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. या राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेसाठी शरद पवार यानी रणशिंग फुंकल आहे. निवडणुकांच्या प्रसारासाठी शरद पवार स्वतः मुंबईत फिरणार असून, पक्षासाठी वेळ देणार आहेत. त्यामुळे आता पासूनच कामाला लागा अशा सूचना त्यांनी कार्यकत्र्यांना दिल्या आहेत.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. राष्ट्रवादी काँग्रेस सलग दोन दिवस बैठक झाली.पक्षाची ताकद वाढवण्याची गरज आहे. आता मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आली आहे. तसेच राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे पक्षाची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. मुंबईतील कोणत्याही वाॅर्डमध्ये मी प्रचारासाठी यायला तयार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पक्षाचे कार्याध्यक्ष राखी जाधव आणि नरेंद्र राणे यांना निवडणुकीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील त्यांनी आज दिल्या.‘कोणी सोबत असो अथवा नसो‘ तयारीला लागा असे शरद पवारांनी आजच्या बैठकीत सांगितले. पक्ष निष्ठा असणारे उत्तम कार्य करत आहेत. मुंबई महानगर पालिका निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. शिवसेने सोबत घरोबा करुन महाविकास आघाडीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता सावधानतेने पावले उचलत आहे यात शंका नाही.

हे सुध्दा वाचाः

खुशखबर ! आता दिवसा मिळणार शेतीला पाणी

‘चला एक झाड लावू या‘ धनंजय मुंडे

‘सुशांत सिंह’ मृत्यू प्रकरणी ‘रिया’ला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!