33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयशरद पवार यांच्यावर उद्या होणार शस्त्रक्रिया; काही दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

शरद पवार यांच्यावर उद्या होणार शस्त्रक्रिया; काही दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP)सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार  (Sharad Pawar) यांच्यावर मंगळवारी (दि.१०) रोजी शस्त्रक्रिया (surgery)  होणार आहे. सोमवारी रात्री ते मुंबईतील ब्रिच कॅन्डी रुग्णालयात (Brich Kandy Hospital) दाखल होणार आहेत, अशी माहिती राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली. खासदार सुनिल तटकरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. (Sharad Pawar will undergo surgery tomorrow; Doctor advice to rest for few days)

शरद पवार यांच्यावर मंगळवारी १० वाजता शस्त्रक्रीया होणार असून त्यांना १८ जानेवारीपर्यंत विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार असून मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी ते विश्रांती घेणार आहेत. दरम्यानच्या काळात ते सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाहीत. तसेच पक्षाच्या बैठका आणि कार्यक्रमांना देखील ते घरातूनच हजर राहणार असल्याची माहिती देखील पक्षातील नेत्यांनी दिली आहे.

कुणबी जोडो अभियानातून रायगडमध्ये एकटवला कुणबी समाज

मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू!

रितेश देशमुखच्या ‘वेड’ ने कमावले इतके कोटी; तिकीटबारीवर तुफान प्रतिसाद

डिसेंबर महिन्यात शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रीया झाली होती. त्यानंतर आता पून्हा त्यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रीया होणार आहे. डिसेंबर महिन्यात देखील शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार यांनी पक्षाच्या शिर्डी येथील कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी