30 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरराजकीयशरद पवार म्हणाले, देशात बदलाचे वातावरण निर्माण होतयं

शरद पवार म्हणाले, देशात बदलाचे वातावरण निर्माण होतयं

पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणूक तसेच नागालॅंड, त्रिपूरा, मेघालय या विधानसभांचे निकाल नुकतेच लागले त्यानंतर शनिवारी (दि.4) रोजी राष्ट्रवादीचे (NCP) संस्थापक अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी निवडणूक निकाल, निवडणूक आयोगासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील निकाल यावर प्रतिक्रीया दिली. निवडणूक निकालांवर बोलताना पवार यांनी देशात बदलाचे वातावरण होत असल्याचे म्हटले. (Sharad Pawar’s reaction after BJP’s defeat in the Pune by-election)

शरद पवार म्हणाले, पदवीधर मतदार संघाच्या झालेल्या निवडणूकीत एखाद्या जागेचा अपवाद सोडल्यास भाजपला एकही जागा मिळालेली नाही, पुण्याच्या कसबा पेठेत देखील धंगेकर यांना जास्त मते मिळाली आहेत. चिंचवडच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे नाना काटे आणि बंडखोर उमेदवार यांच्या मतांची बेरीज केल्यास ती भाजपच्या उमेदवारापेक्षा अधिक होते. कसब्यात धंगेकरांना दोन ठिकाणी अधिक मते मिळाली असून हा बदल पुण्यात होत आहे. याचाच अर्थ लोक वेगळा विचार करण्याच्या टप्प्यावर आहेत. मला मिळालेल्या माहितीनुसार देशात देखील बदलाचा सूर दिसत असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

संदीप देशपांडे हल्ला प्रकरण : महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेच्या उपाध्यक्षाला अटक

खरे तर भ्रष्ट वर्तणुकीसाठी या ४० आमदारांना आत टाकलं पाहिजे

VEDIO : अंबादास दानवे म्हणतात, निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे

नागालॅँडमध्ये राष्ट्रवादीचे ७ उमेदवार निवडणून आले आहेत. नागालॅंड विधानसभेच्या निवडणूकीबाबत (Nagaland Assembly Elections) देखील पवार यांनी प्रतिक्रीया दिली. पवार म्हणाले, नागालॅँडमध्ये राष्ट्रवादीने 12 जागा लढविल्या होत्या त्यामध्ये आमचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. नागालॅंडच्या जनतेचे आभार मानतो असे देखील पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये 12 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये दोन क्रमांकाची मते घेणारा पक्ष ठरला आहे. याबाबत शरद पवार यांनी नागालँडच्या जनतेचे आभार मानले आहेत. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या निवडीबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे. त्यावर बोलताना हा लोकशाहीमधील चांगला निर्णय आहे असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी